शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

२० टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, उल्हासनगरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:57 AM

कारखान्यातील कामगार पळून गेले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगर : कॅम्प नं.-३ येथील पेहुमहल कम्पाउंड येथील प्लास्टिक पिशव्यांच्या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महापालिकेने छापा घालून २० टन प्लास्टिकचा साठा जप्त केला. कारखान्यातील कामगार पळून गेले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.उल्हासनगरमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून पालिकेने बंदची कारवाई केलेले कारखाने सुरू झाल्याची शहरात कुजबूज आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महापालिका यांना पेहरूमल कम्पाउंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी सकाळी ११ वाजता कारखान्यावर छापा घातला असता गोण्यांत २० टन प्लास्टिक पिशव्यांचे घबाड सापडले.छाप्यावेळी कामगारांनी पळ काढला असून कारखानामालकाचा शोध सुरू आहे. असे अनेक प्लास्टिक पिशव्यांचे कारखाने सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. पालिकेची नियमित कारवाई सुरू नसल्याने कारखाने सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.शहरात कारखान्यांची संख्या मोठी असून जीन्स कारखान्यांपाठोपाठ प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीमुळे प्लास्टिकच्या कारखान्यांना ग्रहण लागले. बंदीमुळे यातील अनेक कारखाने गुजरात व भिवंडी-कल्याण ग्रामीण परिसरात स्थलांतरित झाले. मात्र, काही कारखाने लपूनछपून अद्यापही सुरू असल्याचे आजच्या कारवाईवरून उघड झाले.