ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.असे असले तरी या आजाराने मृत्यू होणार्या रुग्णांची संख्येत मात्र, चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात अनेक दिवसापासून जिल्ह्याला मिळणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे ल्सिकारांचा वेग देखील मंदावला आहे. त्यात १८ ते ४४ वयोगाटातील नागरिकांचे लसीकरण देखील थांबले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची लसीकरणासाठी घालमेल सुरु आहे. अशातच जिल्ह्याला ७९ हजार ४४० इतका लसींचा साठ उपलब्ध झाला असून यामध्ये चार हजार ४४० कोव्हाक्सीन तर, ७५ हजार कोव्हीशिल्ड लसींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन महिन्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाने बाधित होण्यापेक्षा लस घेवून सुरक्षित होण्याकडे लहानांपासून जेष्ठ नगरीकांमध्ये चढा ओढ सुरु आहे. असे असले तरी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे अनेकदा लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याचे दिसून आले. त्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या साठ्यामुळे ते देखील शासनाकडून थांबविण्यात आले. त्यात लसीकरणाचा साठाच अपुरा येत असल्याने लसीकरण केंद्राची संख्या कमी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी निम्यापेक्षा कमी लसीकरण केंद्र सुरु आहेत. त्याठिकाणी नागरीकांची लसीकरणासाठी झुंबड उडत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जिल्ह्यात लसीकरण सुरु राहावे, यासाठी शासनाकडून मिळत असलेल्या तुटपुंज्या लसींच्या माध्यमातून कमी जास्त केंद्रांची संख्या करीत लसीकरण सुरु ठेवण्यात आले आहे. त्यातच बुधवारी ठाणे जिल्ह्यासाठी ७९ हजार ४४० इतका लसींचा साठ उपलब्ध झाला असून यामध्ये चार हजार ४४० कोव्हाक्सीन तर, ७५ हजार कोव्हीशिल्ड लसींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
लसीकरण माहिती
जिल्हा कोव्हाक्सीन कोव्हीशिल्डठाणे ग्रामीण - ९३० - १५७५०कल्याण डोंबिवली - ८४० - १४२५०उल्हासनगर - २२० - ३७५०भिवंडी - ३१० - ५२५०ठाणे मनपा - ९८० - १६५००मिरा भाईंदर - ४९० - ८२५०
नवी मुंबई - ६७० - ११२५०एकूण - ४४४० - ७५०००