शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

चोरीचे दागिने दोन वर्षांनी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 12:19 AM

पावणेदहा लाखांचा ऐवज; देवयानी पंडित यांनी मानले पोलिसांचे आभार

टिटवाळा : पूर्वेतील एकवीरा निवास येथे राहणाऱ्या देवयानी पंडित यांना त्यांचे दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले पावणेदहा लाख रुपयांचे दागिने अखेर परत मिळाले आहेत. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते गुरुवारी त्यांना दागिने परत मिळताच, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.पंडित यांच्या घरी ५ मे ते १४ जून, २०१९ या दरम्यान चोरी झाली होती. त्यात चोरट्यांनी घरातील चांदी, तांबे व पितळेची भांडी, तसेच पंडित यांच्या आईचे ५० वर्षांपूर्वीचे सव्वातीन तोळे वजनाचे दागिने, असा एकूण १२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस स्टेशनने २४ जुलै, २०१९ला दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून नऊ लाख ७५ हजार १९९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या चोरट्यांना नंतर भिवंडीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर दोन वर्षांनी गुरुवारी देशमाने यांच्या हस्ते पंडित यांना ते दागिने परत करण्यात आले. दागिने परत मिळाल्याने पंडित यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी त्यांनी पोलिसांचे आभार मानले.दागिने परत मिळाल्याने देवयानी पंडित यांना झालेला आनंद हीच आमच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची पोचपावती आहे.- राजू वंजारी, पोलीस निरीक्षक, टिटवाळा