विक्रमगड : तालुक्याची निर्मिती होऊन १८ वर्षे झाली तरी एकही समस्या न सुटल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील बाजारपेठेत रास्ता रोको केला. सरकार येत सरकार जाते मात्र परिस्थिती जैसे थे राहते. वाढती महागाई,महिलांवरील वाढत असलेले अत्याचार, भ्रष्टाचार दिवसेदिवस वाढत असून सरकार यांची कोणतीही दखल घेत नाही त्यामुळेच या तालुक्याच्या निर्मितीला अठरा वर्षे झाली तरी शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या मंजूर १२३० पदापैकी २७२ पदे अजूनही रिक्त असल्याने विकास ठप्प झाला आहे. तरी हि सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. तरु ण -तरु णींना जिल्हातील नोकरी रोजगारात प्राधान्य द्यावे आणि नोकरी, रोजगार मिळेपर्यंत किमान मासिक ३००० रु पये बेरोजगार भत्ता द्यावा या विविध मागण्या करिता क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाने केलेल्या रास्ता रोकोचे नेतृत्व विक्र मगड तालुका कमिटीचे तालुका सचिव कॉ. कमा टबाले, कॉ.पांडुरंग वारंगडे, कॉ.शांताराम गवळी, कॉ. परशुराम बरतडे, कॉ. सदू सूरम यांनी केले. यावेळी दोन तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प होती. या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तहसिलदार सुरेश सोनावणे यांना आंदोलकांनी निवेदन दिले. ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन तहसिलदारांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले.
विक्रमगड बाजारपेठेत मार्क्सवाद्यांचा रास्ता रोको
By admin | Published: May 05, 2017 5:32 AM