शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

विजय शिवतारे यांना आवरा, अन्यथा आम्ही महायुतीचा धर्म तोडू, आनंद परांजपेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 5:32 AM

Anand Paranjpe : परांजपे म्हणाले की, शिवतारे यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्याविरोधात आगपाखड सुरू आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढूनही ते सातत्याने बारामती लोकसभेमध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करीत आहेत. याचा अर्थ शिंदे यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. शिवतारे महायुतीचा धर्म तोडत राहिले, तर शिवसेनेचा शिंदे गट लोकसभेच्या ज्या जागा लढवणार आहे, तेथे राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील महायुतीचा धर्म तोडू शकतात, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी बुधवारी दिला. 

परांजपे म्हणाले की, शिवतारे यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्याविरोधात आगपाखड सुरू आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल, असे कृत्य करायचे नाही. मात्र, शिवतारे यांच्या कृत्यामुळे शिंदे यांचे आदेश त्यांचेच नेते ऐकत नाहीत, असा संदेश महाराष्ट्रात जात आहे. शिवतारे यांना पुरंदरच्या जनतेने २०१९ मध्ये त्यांची जागा दाखवली आहे. 

कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून मतदारसंघाची मागणी केली असल्याबद्दल परांजपे म्हणाले की, कल्याण मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार व चिन्ह असावे, ही भावना असणे स्वाभाविक आहे. त्यात काही गैर नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज ठाकरे यांची काय राजकीय चर्चा झाली आम्हाला माहीत नाही. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रिपद का नाही?संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिपद का मिळाले नाही? त्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला, तर ते अधिक संयुक्तिक राहील, असा सल्ला परांजपे यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vijay Shivtareविजय शिवतारे