शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

पोखरण स्मशानभूमीविरोधात रस्त्यावर, दुस-या स्मशानाची बळजबरी का? रहिवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:16 AM

पोखरण रोड नं. १ येथील मे. रेप्टोकॉस कंपनीच्या भूखंडावर शिवसेनेच्या एका आमदाराच्या हट्टापायी स्मशानभूमीचा घाट घातला जात आहे. तिचा प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

ठाणे : पोखरण रोड नं. १ येथील मे. रेप्टोकॉस कंपनीच्या भूखंडावर शिवसेनेच्या एका आमदाराच्या हट्टापायी स्मशानभूमीचा घाट घातला जात आहे. तिचा प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. परंतु भरवस्तीत दुसरी स्मशानभूमी कशासाठी असा सवाल करून येथील रहिवाशांनी पुन्हा रस्त्यांवर उतरुन आंदोलन केले. यावेळी त्यांनी पालिका मुख्यालयात महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले.येथील साईलिला रहिवाशी सेवा संघाने यासाठी महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढला. त्यात शेकडो रहिवासी सहभागी झाले होते. पोखरण १ व २ साठी मागील ४० वर्षांपासून उपवन, रामबाग येथे स्मशानभूमी आहे. ती मागील चार वर्षापूर्वी पालिकेने अद्यावत केली आहे. तेथे पूर्वी वनविभागाच्या जागेतून जाण्यासाठी रस्ता होता. परंतु, तो बंद केल्यावर तिला जाण्यासाठी पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. त्यामुळे रामबाग येथील स्मशानभूमी असतांना दुसरी कशासाठी असा सवाल करून या रहिवाशांनी हा मोर्चा काढला होता.या स्मशानभूमी संदर्भातील प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एक किमीच्या आतच दुसरी स्मशानभूमी कशासाठी असा सवाल करून जर या प्रस्तावाला मंजुरी दिली तर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या मोर्चेकर्त्यांनी महापालिकेत महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. महापौरांनीदेखील याबाबत आयुक्तांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी वेगवेगळ््या १२ ते १४ ठिकाणच्या स्मशानभूमीची मागणी लावून धरली होती. पूर्वी रामबाग स्मशानभूमी उपलब्ध होती. परंतु, वनखात्याने तिकडे जाणारा रस्ता बंद केल्याने अनेक महिन्यांपासून ती बंद आहे. त्यामुळे वागळे इस्टेटच्या स्मशानभूमीचा आधार घ्यावालागतो.या परिसरातील वाढती लोकसंख्या व भविष्यातील गरज लक्षात घेऊन या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी परिषा सरनाईक, विमल भोईर, कांचन चिंदरकर, पूर्वेश सरनाईक, आशा डोंगरे, जयश्री डेविड, रागिणी बैरीशेट्टी, राधिका फाटक, नरेंद्र सूरकर यांनी सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे व आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले. पोखरण रोड नं. १ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावरतसेच टिकुजीनीवाडी परिसरात टीएमटी डेपो शेजारील भूखंडावर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही अशाप्रकारची प्रदूषणविरहीत स्मशानभूमीची वास्तू बांधण्याची मागणी केली.प्रदूषणविरहित स्मशानाची मागणीया स्मशानभूमीच्या बाजूने शिवसेनेच्या परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक हे दोघेही उभे राहिले असून तिचा प्रस्ताव मंजूर व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शहरातील सर्वच स्मशानभूमी प्रदूषण विरहित कराव्यात अशी मागणी या दोघांनी पालिकेकडे केली आहे. ंलोकमान्यनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर, शिवाईनगर, विजयनगर, भीमनगर, रामबाग, वसंत विहार, पवारनगर, विवेकानंदनगर, कोकणीपाडा, टिकुजीनीवाडी येथे स्मशानभूमीची मागणी सुरू आहे.