शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

‘माघी’ फेरीवाल्यांच्या पथ्यावर, उत्सवात केडीएमसीची पथके व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:34 AM

रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रात बिनदिककतपणे फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे.

डोंबिवली : रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रात बिनदिककतपणे फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे. रविवारी देखील हेच चित्र दिसले. फेरीवाल्यांचे हे वाढते प्रस्थ पाहता माघी गणेशोत्सवानिमित्त पथकाला सुट्टी दिली आहे का? अशा शब्दात स्थानक परिसराला लागून असलेल्या राजाजीपथ - रामनगर प्रभागाचे मनसेचे स्थानिक नगरसेवक तथा विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभाग अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.रविवारी माघी गणेशोत्सवानिमित्त रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची वाढती गर्दी आणि यात नजीकच्या पदपथांवर, गल्लीबोळांत फेरीवाल्यांचे झालेले अतिक्रमण यात स्थानिक नगरसेवक मंदार हळबे यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट ‘ग’ प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत आणि ‘फ’ प्रभागाचे अधिकारी अमित पंडीत यांना फोन करून त्यांची खरडपट्टी काढली. फेरीवाला पथकाला माघी गणपतीची सुट्टी दिली आहे का? कारवाई बंद केली आहे का? फेरीवाले कंट्रोल का होत नाहीत? अशा शब्दात दोघांनाही हळबे यांनी सुनावले. यासंदर्भात लोकमतने दोघांशी संपर्क साधला असता संपर्क झालेल्या ग प्रभागाच्या कुमावत यांनी रविवारी कर्मचारी वर्ग अपुरा असतो त्यात बंदोबस्ताचे पोलिसही कमी असतात त्यामुळे कारवाईला मर्यादा येतात. सोमवारपासून बेधडकपणे कारवाई सुरू असेल असे सांगितले.केडीएमसी परिक्षेत्रातील रेल्वे स्थानक परिसरातही १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना व्यवसायास मज्जाव करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी कल्याण तसेच डोंबिवली पश्चिमेकडे काटेकोरपणे होत असताना डोंबिवली पूर्व भागात मात्र हे ‘आदेश’ महापालिका प्रशासनाकडून धाब्यावर बसविल्याचे दिसते. ‘आधी पर्यायी जागा’, अशी मागणी डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांकडून होत असली तरी ही मागणी कल्याणमध्येही होत आहे. तेथील फेरीवाले हटले मग डोंबिवलीतील फेरीवाले न हटण्यामागे नेमके कारण काय? हे मात्र गुलदस्त्यात आहे.गेल्या महिन्यात कल्याण स्थानकाच्या बाहेरील फेरीवाला अतिक्रमण पाहता आयुक्तांनी ‘क’ प्रभागाच्या फेरीवाला पथकातील नऊ कर्मचाºयांना निलंबित केले होते. महिना होत नाही तोच त्यांचे निलंबन मागे घेतले गेले असले तरी डोंबिवलीतील निष्क्रीय ठरलेल्या फेरीवाला पथकांवर आयुक्तांची मेहेरनजर का? असा सवाल आहे.आठवडाभरात अवमान याचिकाअवमान याचिकेची नोटीस देण्यात आली आहे. याउपरही वारंवार सूचना करूनही कारवाई होत नसल्याने आठवडाभरात केडीएमसी विरोधात अवमान याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहीती हळबे यांनी दिली. आमच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाली असून लवक रच याचिका दाखल केली जाईल असे ते म्हणाले.

टॅग्स :hawkersफेरीवालेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका