डोंबिवली : कमकुवत झालेला उड्डाणपूल तत्काळ बंद करावा, असे पत्र केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडून वाहतूक विभागाला देण्यात आले होते. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी वाहतूकबदलाची अधिसूचना संबंधित विभागाकडून काढण्यात आली आहे. पूर्व-पश्चिम जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल हा एकमेव मार्ग वाहनचालकांसाठी राहिला असून त्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत.कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक रविवारपासून पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतुकीत बदल केला आहे. कोपरपुलाला पर्यायी मार्ग म्हणून वाहने एस.के. पाटील चौक, टंडन रोड, म्हाळगी चौक, गिरनार चौक, चार रस्ता, टिळक चौकमार्गे, सावरकर रोड येथे डावे वळण घेऊन नेहरू मैदान, दातार चौक, गणपती मंदिर पथमार्गे उजवे वळण घेऊ न नेहरू रोडमार्गे नवीन ठाकुर्ली रेल्वेपूलमार्गे उतरून बावनचाळ, एम.जी. रोडमार्गे पश्चिमेकडे इच्छितस्थळी जातील. दरम्यान, पूर्वेकडील घरडा सर्कल, शेलार चौक, मशाल चौकाकडून मंजुनाथ चौकमार्गे ठाकुर्ली पुलाकडे जाणाºया सर्व वाहनांना मंजुनाथ चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने मंजुनाथ चौकाकडे उजवीकडे वळण न घेता सरळ जाऊ न पुढील चौकात उजवे वळण सावरकर रोडमार्गे आत प्रवेश करून गणेश पथमार्ग आणि नेहरू रोड मार्गाने ठाकुर्ली पुलावरून पश्चिमेला इच्छितस्थळी जातील. सावरकर रोड ते गणेश पथमार्गे दातार चौक, गणपती मंदिर पथ, नेहरू रोड हा रस्ता एकदिशा मार्ग केला आहे. तर, डोंबिवली पश्चिमेकडून ठाकुर्ली पुलावरून येणाºया वाहनांना नेहरू रोडकडे जाण्यास ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेच्या गेटसमोरील रोडवर प्रवेश बंद केला आहे.ही वाहने जोशी हायस्कूलमार्गे मंजुनाथ चौकातून इच्छितस्थळी जातील. जोशी हायस्कूल ते नाना कानविंदे चौकमार्गे मंजुनाथ चौकापर्यंतचा रस्ता अरुंद व रहदारीचा असल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलावरून नाना कानविंदे चौक मार्गे मंजुनाथ चौकाकडे येणाºया सर्व वाहनांना एकदिशा मार्ग केला आहे.>पश्चिमेतील वाहतुकीत बदलडोंबिवली पश्चिमेकडून कोपर उड्डाणपूलमार्गे पूर्वेकडे येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना कोपरपुलाच्या सुरुवातीला कोपर पोलीस चौकीजवळ प्रवेश बंद केला आहे. ही वाहने जुना डोंबिवली रोड, दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट, फुले चौकमार्गे व्होडाफोन गल्ली येथून डाव्या बाजूला वळण घेऊ न सुभाष रोड, नवापाडा रोड, गणेशनगर, बावनचाळमार्गे ठाकुर्ली उड्डाणपुलावरून इच्छितस्थळी जातील. या पुलावरून पश्चिमेकडे येणाºया वाहनांना बावनचाळ येथे उजवे वळण घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सुभाष रोड, नवापाडा, गणेशनगरमार्गे ठाकुर्ली पुलाकडे येणाºया वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही. पर्यायी मार्ग म्हणून ठाकुर्ली पुलावरून पश्चिमेकडे येणारी सर्व वाहने ही सरळ रेल्वे मैदानमार्गे एम.जी. रोडवरून फुले चौक, मच्छी मार्केट, दीनदयाळ रोडमार्गे डोंबिवली पश्चिम येथे इच्छितस्थळी जातील. तसेच, रेल्वे मैदान ते एम.जी. रोडपर्यंतचा रस्ता हा खूप अरुंद असल्याने पश्चिमेकडे येणाºया सर्व वाहनांना रेल्वे मैदान रोड, एम.जी. रोड, व्होडाफोन गॅलरीपर्यंतचा रस्ता एकदिशा मार्ग केला आहे. दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट चौक, फुले चौक, म्हैसकर चौकातून एम.जी. रोडमार्गे पूर्वेकडे जाणाºया वाहनांना व्होडाफोन गल्ली येथे प्रवेशबंदी केली आहे. ही वाहने व्होडाफोन गल्लीतून आत प्रवेश करून सुभाष रोड, नवापाडा, गणेशनगरमार्गे ठाकुली पुलाकडे जातील. तसेच गणेशनगर ते नवीन ठाकुर्ली पुलापर्यंतचा काँक्रिटचा रस्ता हा पुलाकडे जाणाºया वाहनांसाठी एकदिशा केला आहे.>सम-विषम पार्किंगठाकुर्ली उड्डाणपूल ते मंजुनाथ चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात राहणार असल्याने पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या रोडवर दोन्ही बाजूंस सम-विषम पार्किंग केली जाणार आहे.>गणपती मंदिर ते ठाकुर्ली पूल नो-पार्किंगंगणपती मंदिर ते ठाकुर्ली पुलापर्यंतच्या रस्त्यावर टेम्पो उभे केले जातात. त्यामुळे येथे कोंडी होण्याची शक्यता पाहता हा रस्ता नो-पार्किंग क्षेत्र जाहीर केला आहे. तर, पश्चिमेकडील कोपर चौक, एमजी रोड ते रेल्वे मैदानमार्गे ठाकुर्ली पुलापर्यंतचा रस्ता अरुंद व जास्त रहदारीचा असल्याने वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून जोंधळे कॉलेज चौक, दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट, फुले चौक, म्हैसकर चौक-एम.जी. रोड ते ठाकुर्ली उड्डाणपूल हा मार्ग नो-पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाढणार ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:09 AM