- धीरज परबमीरा रोड : मुंबईत लॉकडाऊन शिथिल केल्याने मीरा-भार्इंदरमधून नागरिक कामासाठी रोज जात असताना शहरात लॉकडाऊन वाढवला आहे. याबाबत दुकानदार, उद्योजकांसह रोजंदारीवर पोट असणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनपेक्षा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या काही निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करायला लावा, असे या सर्वांचे म्हणणे आहे. महापालिकेने आधी १ ते १० जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. महापौर, आयुक्त आणि अन्य पक्षांच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवू नये, असा निर्णय झाला असताना अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवला म्हणून १० जुलैला रात्री मीरा-भार्इंदरमध्येही १८ जुलैपर्यंत लॉकडाऊ न वाढवला.यादरम्यान कोरोना चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाणही वाढल्याचे आकडे समोर आले. यामुळे लॉकडाऊ न करूनही रुग्ण वाढत असतील तर उपयोग काय ? असा प्रश्न केला जात आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर उपजीविका चालवणाऱ्यांसह दुकानदार व उद्योजकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये स्टील उद्योग तसेच लहानसहान कारखाने मोठ्या संख्येने आहेत.लॉकडाऊनमुळे कारखाने तीन महिने बंद असल्याने आता कुठे कारखाने हळूहळू सुरू होत असताना पुन्हा लॉकडाऊन वाढवल्याने उद्योग-व्यवसाय व त्यातून मिळणारा रोजगार मोडीत निघेल, असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे दीपक शाह म्हणाले. लॉकडाऊनमध्ये खुलेआम भाज्या आदी विक्री तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळे लॉकडाऊनपेक्षा नागरिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करायला लावा, असे दुकानदार अनुप सातोस्कर म्हणाले. जर नियमांचे पालन केले तर अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले.मेहनत करून पोट भरणा-यांचे काय?लॉकडाऊ नचा राजकारणी, अधिकारी, बिल्डर, मोठे व्यापारी आदींना फरक पडत नाही. पण, रोज मेहनत करून पोट भरणाºया आणि लहानसहान नोकरी-व्यवसाय करणाºया सर्वसामान्यांवर मात्र उपाशी मरायची वेळ आली आहे, असा संताप गटईकाम करणाºया अमृत डोंगरे यांनी बोलून दाखवला.
निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी; मेहनत करून पोट भरणा-यांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:11 AM