कुमार बडदे मुंब्राः मशिदीबाहेर हनुमान चालीसाचे पठन करण्याच्या मनसेच्या इशा-या नंतर बुधवारी पहाटे पासून मुंब्र्यातील प्रमुख मस्जिंदी बाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.३ मे पर्यत मस्जिंदी वरील अनधिकृत भोंगे काढले नाहीत तर मुंब्र्यातील काही मस्जिंदी समोर हनुमान चालीसाचे पठन करण्याची परवानगी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी पोलिसांकडे मागितली होती.ती मिळाली नाही तरी मस्जिंदी बाहेर हनुमान चालीसाचे पठन करण्याचा ठाम निश्चय पक्षाच्या पदाधिका-यांनी जाहीर केला होता.
या पार्श्वभूमी मुंब्रा शहरातील प्रमुख रस्त्याच्या बाजुला रेल्वे स्थानका समोर तसेच कौसा परीसरात असलेल्या जामा मस्जिद तसेच अमृत नगर परीसरातील दारुल फलाह आणि संजय नगर परीसरातील गौसिया मस्जिद बाहेर बुधवारी पहाटे पासून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीमंडळ १ चे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे त्यावर लक्ष ठेऊन होते.रेतीब़दर तसेच कल्याणफाटा,शिळफाटा येथील चौकांमधून शहरात येणा-या वाहनाची कडक तपासणी केल्याऩंतरच वाहने शहरात सोडण्यात आली.दरम्यान येथील मशिदीमधील सकाळची अजान नेहमीप्रमाणे झाली. अजान झाल्यानंतर बराच वेळ कौसा जामा मस्जिदी जवळ स्थानिक मुस्लिम बाधव घुटमळत होते. सकाळी साडे सहा नंतर मस्जिंदी बाहेर पोलिस बंदोबस्त शिथिल करण्यात आला.