नालासोपारा : जनतेच्या अनेक समस्यांसाठी शासनाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे राज्यभर जेलभरो आंदोलन बुधवारी छेडण्यात आले होते. याच अनुषंगाने वसईतही आंदोलन करण्यात आले होते. पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून वसईच्या उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्या कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाकडे या मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, असे आंदोलकांना सांगण्यात आले.
या आंदोलनासाठी वसई तालुका अध्यक्ष दुशांत पाटील, पालघर तालुका अध्यक्ष गणेश तांबडी, एकत्व मित्र मंडळ अध्यक्ष मारुती पेडामकर, विरार शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटना कमलेश सिंग, युवा विरार शहर अध्यक्ष विराज कोचरेकर, वार्ड अध्यक्ष राजेश भोसले, विवेक ठाकूर, अफसर अली अन्सारी, सचिन चौधरी, सचिन सावंत, युवा अध्यक्ष साहिल खान, हिथ देसाई, नईम सय्यद, नंदु सोलंकी, सईद शेर अली खान, अकबर, सनी पेडामकर, विजय पाल, विजय भाई, अझर व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.