ठाणे : कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार ठामपाने मास्कचा वापर न करणाऱ्या ३०५ नागरिकांकडून दोन दिवसांत एक लाख ५२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय पथक तयार करण्यात आले आहे. २० आणि २१ फेब्रुवारी या दोन दिवसांत मास्कचा वापर न करणाऱ्या ३०५ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत १३ हजार, कळवा १६ हजार ५००, उथळसर प्रभाग समिती १२ हजार, माजीवडा प्रभाग समिती १८ हजार ५००, वर्तकनगर प्रभाग समिती ११ हजार ५००, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती १४ हजार, नौपाडा-कोपरी ४३ हजार ५००, वागळे प्रभाग समिती १२ हजार, तर दिवा प्रभाग समिती ११ हजार ५००, असा एकूण एक लाख ५२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
--------------