पवार कुटुंबीयांसाठी संघर्ष काही नवीन नाही; आयकर छाप्यांनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:00 PM2021-10-08T13:00:51+5:302021-10-08T13:01:13+5:30
Supriya Sule On Income Tax Raid : सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुळे यांचं वक्तव्य.
"ते नुसते दादांचे नातेवाईक नसून आमचे एकत्र कुटुंब आहे. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही," अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून पवार कुटुंबीयांना संघर्ष नवीन नसल्याचे त्या म्हणाल्या.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तुळजा भवानी मंदिरामध्ये महाआरतीसाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ठाण्यात ही प्रति क्रिया दिली. ज्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत ते केवळ दादांचे नातेवाईक नसून आमचेही नातेवाईक असल्याचे सांगत आमचे सर्वांचे एकत्र कुटुंब असल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीकडून अशा प्रकारे सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
आघाडी सरकारचे मानले आभार
मंदिरे उघडल्याने आघाडी सरकारचे आभार मनात नियम पळूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कारकर्ते आणि नागरिकांना केले. वर्षातून नऊ दिवस एकदाच शांताबाई पवार आणि माझी आई उपाय पकडायच्या. तिच प्रथा माझ्या आईने सुरु ठेवली. त्यामुळे नवरात्रोत्सव माझी आईच असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारचे आभार मानताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आजित पवार, बाळासाहेब थोरात यांचेही त्यांनी आभार मानले.