सदानंद नाईक
उल्हासनगर : विठ्ठलवाडी व उल्हासनगर वाहतूक विभागाने ९ महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई अपघातांच्या प्रमाणात घट झाली आहे. पोलिसांनी वाहनधारकांकडून सुमारे एक कोटी रूपयांचा दंड वसूल केला असून, सर्वाधिक गुन्हे विनापरवाना वाहन चालविण्याचे दाखल केले आहेत.
उल्हासनगर वाहतूकविभागाने रस्ता सुरक्षा सप्ताह शिस्तबध्द रितीने साजरा केल्याने हा विभाग प्रकाशझोतात आला. विठ्ठलवाडी व उल्हासनगर वाहतूक विभागाने चालू वर्षी चमकदार कामगिरी केली असून दंडात्मक रक्कमेची वसुलीही कोट्यवधीच्या घरात गेली. एकट्या उल्हासनगर वाहतूक विभागाने ९ महिन्यांत एक कोटीची दंडात्मक वसुली केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक घेटे यांनी दिली. भरधाव गाडी चालवणे, विनापरवाना गाडी चालवणे, अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे, मद्यपाशन करून गाडी चालवणे, पोलिस-प्रेस आणि मराठी नंबर प्लेट लिहिलेल्या गाड्यांवर एकूण ३९ हजारांपेक्षा जास्त केसेस दाखल करून त्यांच्याकडून ९३ लाख ५७ हजाराचा दंड वसूल केला. सर्वाधिक केसेस विनापरवाना गाडी चालवल्याच्या आहेत.विठ्ठलवाडी वाहतूक विभागाची कामगिरी उल्हासनगर विभागाच्या खालोखाल आहे. या कारवायांमुळे अपघातांच्या प्रमाणात दोन्हीकडे घट झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक घेटे यांनी दिली. एका वर्षात दोन्ही वाहतूक विभागाची दंडात्मक वसुली दोन कोटींपेक्षा जास्त होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील मुलांना वाहतूक नियमांबाबत माहिती मिळण्यासाठी ट्राफिक गार्डनची संकल्पना त्यांनी मांडली असून, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे सांगितले.मुंबईला दोन ट्राफिक गार्डन असून उल्हासनगरात तसे गार्डन उभे राहिल्यास, हजारो विद्यार्थ्यांनावाहतूक नियमाची माहिती देता येईल. मुलांच्या सहलीचे हे मुख्य ठिकाण होणार असल्याचेही घेटे यांनी सांगितले.ई-चलन मशिनद्वारे दंडवसुलीच्वाहतुकीचे नियम मोडणाºयांकडून वाहतूक पोलिस विशिष्ट रकमेची पावती यापूर्वी देत होते. त्यावरून नागरिक व पोलिसांत अनेकदा वाद झाले आहेत. १४ फेबु्रवारीपासून शासनाने ई-चलन मशिनद्बारे दंडात्मक रक्कम घेण्याची सुविधा वाहतूक विभागाला दिली.च्त्यानुसार रोख नसेल, तर एटीएम कार्डद्वारे दंडाची रक्कम देता येणार आहे. वाहनधारकावर पूर्वीची दंडाची रक्कम बाकी असेल, तर तीही रक्कम ई-चलन मशीन दाखविणार आहे.