- पंकज रोडेकर ठाणे : खासगी बससेवेमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची प्रवासी संख्या आधीच कमी झाली आहे. ती वाढण्यासाठी राज्य परिवहन विभागाने १ मार्च ते ३० एप्रिल असे प्रवासी भारमान अभियान सुरू केले आहे. यासाठी प्रवासी भारमान वाढवणाऱ्या डेपोंना (आगार) रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या अभियानाला ब्रेक लागण्याची भीती वर्तवली जात आहे. कोरोनामुळे ठाणे परिवहन विभागातील प्रवासी भारमान हे गेल्या काही दिवसांत २० टक्क्यांनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे परिवहन विभागांतर्गत आठ डेपो येत असून, सुमारे ६०० गाड्या राज्यभर धावत आहेत. त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीत प्रवासी भारमान नेहमीच कमी होते. यामुळे या अभियानात ठाणे परिवहन विभागाने प्रवासी भारमान वाढून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ठाणे विभागातील भारमान जवळपास ६५ इतके आहे; परंतु सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. यामुळे सद्य:स्थिती प्रवासी भारमान वाढण्याऐवजी ते सुमारे २० टक्क्यांनी क मी झाले असून, ठाणे परिवहन विभागाचे भारमान हे ४० टक्क्यांवर आले आहे.एसी बसमध्ये सॅनिटायझरची व्यवस्थामहाराष्टÑ राज्य परिवहन सेवेच्या वातानुकूलित बसमध्ये ठाणे परिवहन विभागामार्फत सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. बसमधील प्रत्येक प्रवाशांच्या हातावर देऊन त्यांचा प्रवास सुखकार व्हावा, हा उद्देश आहे. त्याचबरोबर या सॅनिटायझरच्या बाटल्या प्रामुख्याने मीरारोड-भार्इंदर आणि पुणे या ठिकाणी धावणाºया बसच्या स्थानकांवर आणि चालकांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुण्याकडील प्रवासी संख्येत घटठाण्याच्या वंदना एसटी स्टॅण्डवरून एकूण ५६ फेºया या दिवसाला ठाणे ते पुणे अशा धावतात. मात्र, कोरोनामुळे आता पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची संख्याही घटली आहे. शनिवारी सकाळी तर वंदना येथे सात गाड्या उभ्या होत्या. मात्र, पुण्याला जाणाºया प्रवाशांची संख्या ही अवघी एक होती. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली तर पुण्याकडे गाड्या सोडण्यात येतील, अन्यथा विनाकारण बस सोडणे चुकीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर अक्कलकोट आणि शिर्डीकडे जाणाºया प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.टीएमटीच्या सेवेवरपरिणाम नाहीठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेवर कोरोनाचा सद्य:स्थितीत कोणताही परिणाम झालेला नाही. प्रवासी संख्या वाढलेली नाही, तशीच ती कमी झालेलीही नाही, अशी माहिती ठामपा परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
एसटीची प्रवासी संख्या २० टक्क्यांनी घटली, प्रवासी भारमान अभियानाला कोरोनामुळे ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 1:14 AM