ठाणे: बिकट आर्थिक परिस्थितीत आणि अभ्यासासाठी अतिशय प्रतिकूल अशा वातावरणात राहून नववी, दहावी सारख्या कठीण परीक्षेला तोंड देताना एकलव्य विद्यार्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना या खडतर काळात सर्वतोपरी सहाय्य करून त्यांच्या अभ्यासाचा मार्ग सुकर करावा तसेच त्यांचा वैचारिक आणि सामाजिक विकास व्हावा या उद्दिष्टाने ‘समता विचार प्रसारक संस्था’ एकलव्य विद्यार्थी सक्षमीकरण योजना या २०१८ पासून सुरू करत आहे. यामध्ये प्रामुख्याने ठाणे महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि रात्रशाळा या शाळांंतील नववीतून दहावीला जाणाºया एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विशेष अभ्यास मार्गदर्शन वर्ग विनामूल्य घेण्याचे ठरवले आहे.या योजनेमध्ये आता नववीत असलेल्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना एप्रिल पासूनच दहावीचे विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करणे आणि ते वर्षभर चालवणे, त्यांना अभ्यासाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष शिबीर घेणे, त्यासाठी मनसोपचार तज्ञांची मदत घेणे, त्यांच्यासाठी पोषक आहाराची व्यवस्था करणे, त्यांना पाठ्यपुस्तके पुरवणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही या सर्व प्रक्रि येत सामील करून घेतले जाणार आहे. या योजनेसाठी ठाणे महानगर पालिकेकडूनही सहयोग अपेिक्षत आहे. या योजनेवर साधक बाधक चर्चा घडवून आणण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. जिज्ञासा चे सुरंद्र व सुमिता दिघे, संध्या धारडे, ठाणे महापालिकेच्या निवृत्त मुख्याध्यापिका संध्या सनेर, निवृत पर्यवेक्षिका व शिक्षिका शरयू पाळंदे, सरस्वती सेकंडरी स्कूलचे सुरेश जंगले, मो.ह. विद्यालयाचे मिलिंद चितळे, ठाणे महापालिकेच्या शिक्षिका पुष्पा पालकर, मुंब्र्यामद्धे दहावीचे क्लासेस चालवणारे शैलेश मोहिले, आय.टी तज्ञ सई जोशी आदी मान्यवरांनी आपल्या अनमोल सूचना देऊन सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विजेटिआयचे अधिष्ठाता डॉ. संजय मंगला गोपाळ यावेळी अध्यक्षस्थानी होते.गेली २६ वर्षे ‘एकलव्य गौरव पुरस्कार’ या उपक्र माद्वारे अनेक गरीब आणि होतकरू तरु णांना प्रोत्साहीत करून त्यांच्या जीवनाला आकार देण्याचे कार्य करणाºया ‘समता विचार प्रसारक संस्थेच्या’ या नवीन आणि अधिक व्यापक उपक्र माचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे असे या उपक्र माच्या संयोजक आणि निवृत्त शिक्षिका मनीषा जोशी आणि संस्थेचे सचिव संजय निवंगुणे यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया आणि विरपाल भाल, संस्थेच्या उपाध्यक्षा आणि ठाणे महानगर पालिकेतील शिक्षिका कल्पना भांडारकर, संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या अर्णि निवृत्त शिक्षिका लतिका सु.मो. आणि हर्षलता कदम, संस्थेचे कार्यकर्ते सुनील दिवेकर, मीनल उत्तुरकर, ओंकार जंगम, सोनाली महाडीक हे उपस्थित होते. संस्थेची एकलव्य कार्यकर्ती अनुजा लोहार हिने सर्वांचे आभार मानले.
ठाण्यातील एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी सक्षमीकरण योजना - समता विचार प्रसारक संस्थेचा नवीन उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 4:42 PM
समता विचार प्रसारक संस्थेचा नवीन उपक्र म सुरूवात असून यात ठाण्यातील एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विनामूल्य विद्यार्थी सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे ‘समता विचार प्रसारक संस्था’ एकलव्य विद्यार्थी सक्षमीकरण योजना या २०१८ पासून सुरू एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विशेष अभ्यास मार्गदर्शन वर्ग विनामूल्यनववीत असलेल्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना एप्रिल पासूनच दहावीचे विशेष मार्गदर्शन