ठाणे: मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल्या विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मुंबईकरांचे जीवनमान उलगडण्यात आले. अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी कथा, कवितांमधून मुंबईचे दर्शन घडविले. निमित्त होते ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित केलेल्या लिटररी असोसिएशन आणि मराठी वाड्.मय मंडळाच्या उद्घाटन सोहळ््याचे. बुधवारी हा सोहळा ‘मुंबई द सिटी युनायटेड’ या कार्यक्रमाने संपन्न झाला. मुंबईकर, कामगार चळवळ, इथले उद्योगधंदे, खाद्यसंस्कृती, गुन्हेगारी जग, काळाबाजार, वेश्यावस्ती अशी सगळी मुंबई व्यापणारे साहित्य आज ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. अक्षय आणि धनश्री यांनी आपल्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांबरोबर, प्राध्यापकांचीही मने जिंकली. मुंबई – या तीन अक्षरात जणू विश्व सामावलं आहे. वसूधैव कुटुंबकम चं मूर्तरूप म्हणजे मुंबई. अनेक नावांनी गौरवली जाणारी आणि तितक्याच शिव्याशाप उरापोटात दडवून माणसांना झेलणारी हि महानगरी एका अजस्त्र पर्वतासारखी आहे. वेगवेगळे धर्म, भाषा, आर्थिकस्तर असणारी असंख्य माणस या मुंबईत राहतात. नशिबाला बांधलेल्या घड्याळासोबत धावतात, जगतात, मुंबईच हृदय धडधडत ठेवतात. त्यांचा आणि मुंबईचा संबंध म्हणजे हत्ती आणि आंधळ्या सारखा आहे. ज्याची-त्याची मुंबई निराळी आहे. सात बेटांचं हे शहर... कित्येकांना भूरळ पडणार. या शहराने इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं केलंय. एकाबाजूला झगमगाट, सोनेरी स्वप्नांच्या या शहरात अंधारे, कुबट कोपरे घेऊन हे शहर विस्तारत चाललंय. अनेक लेखक, कवी, चित्रकार यांनी आपल्या कलेतून मुंबईला व्यक्त केलं. तिचा सौंदर्य टिपलं. मुंबईच्या प्रत्येक बाजूवर या डोळस माणसांनी लिहून ठेवलाय.. मुंबईकर, कामगार चळवळ, इथले उद्योगधंदे, खाद्यसंस्कृती, गुन्हेगारी जग, काळाबाजार, वेश्यावस्ती अशी सगळी मुंबई व्यापणारा हे साहित्य. काही ओळखीचं काही अनोखळी पण यातून घडणारा मुंबईचा समग्र दर्शन आपल्याला तिच्याकडे नवी नजर देणारं. हे सगळं लिहिणारी माणसं काही बाहेरची, नावाजलेली, लेखक, कवी तर काही अगदी तुमच्या आमच्यातली...मुंबई रक्तात भिनलेली, मुंबईवर प्रेम करणारी. याच प्रेमापोटी घडवलेलं हे साहित्यातलं मुंबई दर्शन, “मुंबई – The City United” या कार्यक्रमातून अक्षय शिंपी, धनश्री खंडकर या कलाकारांनी घडविले. यावेळी लिटररी असोसिएशनच्या माधुरी पाथरकर, इंग्रजी विभागाच्या प्रमुख ऋणा सजिव, प्रा. डॉ. धनंजय मुळस्कर, प्रा, जितेंद्र हळदणकर, प्रा. रुपाली मुळ््ये, बाबासाहेब कांबळे, तुषार चव्हाण, संतोष पाठारे आदी उपस्थित होते.
ज्ञानसाधना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 5:18 PM
ज्ञानसाधना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या कलाकारांनी कथा, कवितांमधून मुंबईचे दर्शन घडविले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना कलाकारांनी साहित्यातून घडविले मुंबई दर्शनज्ञानसाधना महाविद्यालयात लिटररी असोसिएशन आणि मराठी वाड्.मय मंडळाचा उद्घाटन सोहळासाहित्यातलं मुंबई दर्शन, “मुंबई – The City United” या कार्यक्रमातून सादर