डोंबिवली : आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून शिकवणी घेणा-या शिक्षिकेची डोक्यात कुकर घालून निर्घृण हत्या करणा-या माजी विद्यार्थ्याला कल्याण परिमंडळ-३ च्या उपायुक्तांच्या स्कॉडच्या पोलिसांनी अवघ्या चार तासांतच अटक केली आहे.कोपर गावातील ओम परशुराम अपार्टमेंटमध्ये मनीषा खानोलकर (वय ६०) या १७ वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. त्या घरात शिकवणी घ्याच्या. रविवारी दुपारी शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने मुलांनी ही बाब शेजाºयांच्या निदर्शनास आणली. खानोलकर यांची प्रकृती ठीक नसल्याचा संशय आल्याने शेजाºयांनी घराचा दरवाजा तोडला. त्या वेळी खानोलकर यांचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या मृतदेहाच्या शेजारीच रक्ताने माखलेला कुकर पडून होता. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.त्यादरम्यान, काही दिवसांपूर्वी मनीषा यांचे एका महिलेशी भांडण झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अविनाश पालादे यांना मिळाली. त्याआधारे त्यांनी त्या महिलेचा शोध घेत तिचा मुलगा रोहित तावरे (२१) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तो त्यांचा माजी विद्यार्थी आहे. चौकशीत त्यानेच खानोलकर यांची हत्या केल्याची कबुली दिली.खानोलकर यांनी आपल्या आईला शिवीगाळ केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी रोहित त्यांच्या घरी शनिवारी दुपारी गेला होता. त्यावेळी खानोलकर आणि रोहित यांच्यात बाचाबाची झाली.
विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची हत्या, आईला शिवीगाळ केल्याचा राग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:07 AM