शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उपकेंद्रातील विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 12:26 AM

Education News : ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही.

ठाणे - मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील विधी आणि न्याय शाखेच्या ३६ विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून गुणपत्रिकाच दिली नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नाहीत. या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत गुणपत्रिका न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिला आहे.ठाण्यातील उपकेंद्रामध्ये ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिका दिलेली नाही. केवळ सूचनाफलकावर निकाल जाहीर केला जातो. मात्र, हा निकाल जाहीर करताना कोणाला एटीकेटी लागली आहे, याची नोंद केली जात नसल्याने पुन:तपासणीसाठी अनेक विद्यार्थ्यांकडून ९९९ रुपये घेतले जातात. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण झाले असल्याचे समजते. यातून मुलांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नसतो. उपकेंद्राच्या समन्वयक म्हणून राऊत नावाच्या एक अधिकारी आहेत. मात्र, त्यादेखील तेथे उपस्थित नसतात. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असूनही स्वतंत्र फॅकल्टीची निर्मिती न करता तात्पुरत्या कारभारावर हे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे चार वर्षांच्या परीक्षा देऊनही गुणपत्रिकाच मिळालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थी वकिलीची सनदही मिळवू शकले नसल्याचे खामकर यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांशी साधला संवादnविक्रम खामकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा पल्लवी जगताप आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाच्या बाळकुम येथील उपकेंद्राला भेट दिली. nयावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता हा प्रकार उघडकीस आला. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनाही ही बाब सांगितलेली असून १५ दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दिल्या नाही, तर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही खामकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षण