शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

विद्यार्थ्यांना करून देणार ठाण्याची ओळख, टीएमटीतून शहरात फिरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:48 AM

परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देणे आदी विविध योजना महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

ठाणे  - शाळांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी नवनवीन योजना राबविणे तसेच सर्व शाळांमध्ये समानता, भौतिक सुविधा उपलब्ध करणे, शैक्षणिक सहकार्य सेतू, दीपस्तंभ तसेच परिवहन बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ठाणे शहराची पर्यटनाद्वारे नवीन ओळख करून देणे आदी विविध योजना महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.ठाणे महापालिका शिक्षण विभागाने मनपा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्य प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी २४ जूनला सहविचार सभा गडकरी रंगायतन येथे आयोजिली होती. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, यशदा संस्थेचे कार्यक्रम अधिकारी शाम मकरंदपुरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संतोष कदम तसेच शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.गणित, इंग्रजी याविषयांबाबत शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. जग बदलण्याची क्षमता शिक्षणात असल्याचे मत रेपाळे यांनी व्यक्त केले, शैक्षणिक धोरणाच्या बदलाप्रमाणे बदलता आले पाहिजे. तसेच विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मुख्याध्यापकांनी दक्ष असणे आवश्यक असल्याचे मत शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी व्यक्त केले. गणित सर्व मुले शिकतात, असे सांगून शिक्षकांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मकरंदपुरे यांनी व्यक्त केले.शालेय जीवनापासूनच हवेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडेशालेय व्यवस्थापन, शिक्षण कार्यप्रणाली, नवनवीन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण, स्वच्छता नियोजन, वातावरण निर्मिती, अध्ययन, अध्यापना वातावरण निर्मिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हे शालेय जीवनापासूनच देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती सारख्या परीक्षांसाठी त्यांना प्रोत्साहित करून परीक्षांबाबत त्यांना मार्गदर्शन करणे आदी विविध मते या सभेत मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे