शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
5
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
6
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
7
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
8
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
9
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
11
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
12
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
13
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
14
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
15
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
16
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
17
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
18
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
19
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या तऱ्हेवाईक वागणुकीवर टाकला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 4:47 PM

मराठी ग्रंथ संग्रहालय आयोजित शारदोत्सवचा समारोप सुबोध जावडेकर यांच्या कार्यक्रमाने झाला. 

ठळक मुद्देसुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या तऱ्हेवाईक वागणुकीवर टाकला प्रकाशमेंदू हा सतत दक्ष असतो असे नसून तो अनेकदा फसू शकतो : सुबोध जावडेकर लेखक - वाचक संवाद देखील संपन्न

ठाणे : मेंदू हा सतत दक्ष असतो असे नसून तो अनेकदा फसू शकतो. नसलेल्या गोष्टीही तो कधी दाखवतो व त्या आहेत असा आपल्याला भास निर्माण होतो.” अशा शब्दात सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या अशा तऱ्हेवाईक वागणुकीवर चांगलाच प्रकाश टाकला. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांनी आयोजित केलेल्याया कार्यक्रमात सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक सुबोध जावडेकर बोलत होते. त्यांनी दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून मेंदूच्या अनेक चकित करणाऱ्या रहस्यांवर प्रकाश टाकला.

        साहित्यिक गप्पांनी शारदोत्सवास प्रारंभ झाला. समारोप सोहळ्यात जावडेकर यांच्या मानवी वर्तन आणि मेंदू विज्ञान हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लेखक - वाचक संवाद देखील पार पडला. “वीस लाख वर्षांपूर्वी मानव अस्तित्वात आला असला तरी, मानवी मेंदूचा विकास हा गेल्या ५० हजार वर्षात अधिक झाला.” असे त्यांनी सांगितले. मानवी मेंदू मध्ये दोन यंत्रणा काम करत असतात क्षणिक निर्णय (fight or flight response) आणि विचारपूर्वक सावकाश निर्णय (Rest and Digest response) गरजेप्रमाणे निर्णय मेंदू घेत असतो.संकटातून मानवाचे रक्षण करणे हेच मेंदूचे मुख्य कार्य असते. मेंदूतील आठवणी ह्या चिरेबंदी नसतात. लेखक वाचक संवाद या अंतर्गत लेखक सुबोध जावडेकर वाचकांशी संवाद साधला. अनेक रंजक उदाहरणे देत मेंदूचे वर्तन उलगडून दाखवले. वाचकांनी अनेक प्रश्न विचारून उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले. विज्ञान लेखक होण्यासाठी प्रथम लेखक असणे गरजेचे आहे. मेंदूचे कार्य कास चालत यावर सांगताना ते म्हणाले, मेंदू (त्याच्या दृष्टीने ) अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मेंदू जरुर पडली तर चीटिंग करून, मखलाशी करून अर्थ लावतो. मेंदू रिकाम्या जागा स्वतःच भरून काढतो, मेंदू स्वतःचे नियम  बनवतो, हे नियम पूर्वानुभानावर अवलंबून असतात, तुमच्या संस्कारांवरही अवलंबून असतात. मराठी ग्रंथ संग्रहालयाने लेखक व वाचक यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी दर महिन्याला कार्यक्रम सुरु केला आहे असे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सांगितले. याप्रसंगी ठाण्यातील ख्यातनाम डॉक्टर विकास हजिरनीस हेही उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक