राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे सुयशडोंबिवली- थिएटर मुव्हमेंट कटक ओडिशा यांच्यातर्फे १८ व्या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य, नाटय, संगीत स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत चंद्रकांत पाटकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विभागात १७ बक्षीसे जिंकून आपली वेगळी छाप उमटविली आहे.या स्पर्धेत २२ राज्यातील सुमारे १००० कलाकरांनी आपली कला सादर केली होती. शाळेचे शिक्षक विवेक ताम्हणकर यांना राष्ट्रीय सन्मान सोहळ््यात लोककला, लोकनृत्यातील विशेष कामगिरीबद्दल नृत्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तन्वी कदम हिला भरतनाट्यम मधील योगदानाबद्दल नृत्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नहुष फडके, सायली गावकर, हर्ष साठे, राधिका जोशी, दीक्षा प्रभू, शांभवी परब, रीना मोरे, रिया मोरे, संचिता मांजरेकर,ऋतुश्री राव, हर्षदा बोर्गे, मानसी जगताप, यश कारंडे, अथर्व जाधव, तन्वी कदम, मृणाल मेजारी, सक्षम पावले, ओमकार मेजारी, सिध्दी नाडकर या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. नाटय,लेखन, दिग्दर्शन व नृत्य दिग्दर्शन विवेक ताम्हणकर यांनी केले होते.भरतनाट्यम् मध्ये तन्वी कदम हिने प्रथम पारितोषिक तर मृणाल मेजारी हिने द्वितीय पारितोषिक मिळविले आहे. हर्षदा बोर्गे हिने लोकनृत्यात द्वितीय क्रमांक पटकाविला होता. सिध्दी नाडकर हिने कथ्थकमध्ये अध्यक्षीय पुरस्कार, संचिता मांजरेकर हिने पाश्चात्य नृत्यात तृतीय पारितोषिक पटकाविले आहेत. सक्षम पावले याने वाद्यवादनात प्रथम क्रमांक मिळविला आहे. अथर्व जाधव याने वाद्यवादनात अध्यक्षीय पुरस्कार पटकाविला आहे. दीक्षा प्रभू हिने लोकसंगीतात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. मृणाल मेजारी हिने पाश्चात्य नृत्यात अध्यक्षीय पुरस्कार मिळविला आहे. एकलव्य या नाटकासाठी विवेक ताम्हणकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा अध्यक्षीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट लेखनाचा अध्यक्षीय पुरस्कार, आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचा प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. एकलव्य (हिंदी ) नाटकाला तृतीय क्रमांक, समूह वाद्यवादन द्वितीय क्रमांक, लोकनृत्याला तृतीय क्रमांक मिळाला आहे.फोटो आहे.-------------------------------------------------------------