शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

कळवा उड्डाणपुलाचा ११० टनाचा लोखंडी सांगाडा १४ मीटर उंच बसविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 8:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन ...

ठळक मुद्दे चार तासांमध्ये पार पडली मोहीम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन उड्डाणपुलावरील १०० मीटर तसेच ११०० टनाचा मुख्य सांगाडा अवघ्या चार तासांमध्ये बसविण्यात ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांना यश आले आहे. हा सांगाडा बसविल्यामुळे कळवा उड्डाणपूलाच्या कामाला वेग आला असून लवकरच दुसऱ्या टप्याचे कामही पुढील आठवडयामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे तसेच ठाणे बेलापूर मार्गे जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल अस्तित्वात आहे. तो जुना तसेच धोकादायक सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीला बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी १९९५- ९६ च्या दरम्यान बांधलेल्या पूलाचा सध्या वापर सुरु आहे. ठाणे शहरातील वाहन संख्याही मोठया प्रमाणात वाढली. त्यामुळे या एकाच पुलावर वाहतूकीचा ताण येऊन मोठया प्रमाणात कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी या नवीन पूलाची उभारणी करण्यात येत आहे.गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पूलाच्या खाडीवरील ११०० टनाचा लोखंडी सांगाडा बसविण्यास सुरुवात झाली. यावेळी लॉचींगसाठी बसविलेले तात्पुरत्या आधाराचे वजन १०० मेट्रिक टन आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान, हा सांगाडा बसविण्याचे काम मोठया कौशल्याने पूर्ण करण्यात आले. या स्पॅन फॅब्रीकेशनचे काम दमणच्या पी.एस.एल.कंपनीमध्ये झाले असून यासाठी वापरलेले विशिष्ट प्रकारचे टेन्शन रॉड हे परदेशातून आयात केले आहेत. हा सांगाडा बसवण्यात आल्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये हा सांगाडा १०८ मीटर जमीनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा सात दिवसांनंतर सुरु करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

‘गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरीत्या झाल्यामुळे सप्टेंबर अखेर हा उड्डाणपूल सुरु होईल. याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी होणार वाहतूक कोंडी दूर होण्यास आता मोठी मदत होईल.’- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री.................

तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांचे खरे आभार मानायला हवे. त्यांच्या काळात पाठपुरावा करण्यात आला असून एक स्वप्न पूर्ण होत आहे. दोन शहरांना जोडणारे हे मोठे प्रकल्प आहेत त्यामुळे अवजड वाहने कळव्यात उतरता नवी मुंबईच्या हद्दीत पटनीला उतरण्याची सूचना मी केली आहे.- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री. 

टॅग्स :thaneठाणेkalwaकळवाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका