शहरं
Join us  
Trending Stories
1
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
2
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
3
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
4
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
5
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
6
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
7
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
8
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
9
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
10
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
11
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
12
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
13
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
14
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
15
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
16
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
17
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना यश; उल्हासनगर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर

By सदानंद नाईक | Published: October 19, 2024 8:24 PM

चव्हाण यांनी एक मनाने निवडणुकीला सामोरे जाऊन विजश्री खेचून आणण्याचे आदेश दिले.

सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनीं उल्हासनगर पक्ष कार्यालयात शनिवारी दिवसभर ठाण मांडून स्थानिक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत संवाद साधून एकमेकां विषयी असलेली नाराजी दूर केली. तसेच एक मनाने निवडणुकीला सामोरे जाऊन विजश्री खेचून आणण्याचे आदेश दिले.

उल्हासनगर भाजप उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षाने थेट आमदार कुमार आयलानी यांच्यावर आरोप केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर उत्तरभारतीय सेलच्या अध्यक्षाने वंचित पक्षात प्रवेश करून उमेदवारीची तिकीट मिळविले. पक्षाकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याने, पक्ष येते चिंतीत होते. अखेर पक्षनेते रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगर पक्ष कार्यालयात शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत स्थानिक पक्ष नेते व कार्यकर्ते, महिला आघाडी व इतर विविध सेलच्या पदाधिकार्या सोबत संवाद साधून विधानसभा मतदारसंघाबाबत चाचपणी केली. भाजपकडून विद्यमान आमदार कुमार आयलानी व शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी असे दोघेत इच्छुक असून इतर इच्छुकांनी निवडणुकीतून माघार केल्याचे चित्र भाजपच्या बैठकीत उघड झाले. तर शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पक्षनेते रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्या सोबत संवाद साधून त्यांच्या उत्साह भरल्याचे सांगितले.

 आयलानी यांना डच्चू? महाविकास आघाडी कडून ओमी कलानी यांचे नाव निश्चित मानले जात असून महायुतीकडून विधमान आमदार कुमार आयलानी यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भाजपने आयलानी याना डच्चू देऊन ओमी कलानी याना तिकीट देणार आहे. अशी चर्चा शहरात रंगली. तर दुसरीकडे आमदार कुमार आयलानी हेही बंडखोरी करून महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊ शकतात. या चर्चेलाही ऊत आला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर