ठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन शालेय वर्ग सुरू झाले खरे, पण लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोबाइल नेट पॅकची समस्या भेडसावू लागली. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी गेले चार महिने ज्ञानह्यजागरह्ण ही मोफत नेटपॅक योजना यशस्वीपणे राबविली आहे. सुमारे एक हजार ४६० विद्यार्थ्यांना दरमहा ह्यमोफत नेटपॅकह्ण दिले जात आहे.संजय केळकर यांच्या जागर फाउंडेशन या संस्थेने ठाणे शहरातील इयत्ता १०वीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यापासून मोफत नेटपॅक योजना सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार-व्यवसाय बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचा तर रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.दरम्यान, ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, मात्र गरीब विद्यार्थ्यांपुढे इंटरनेट पॅकची समस्या उद्भवू लागली. त्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून मोफत नेटपॅक योजना सुरू केली. नेटपॅक मिळाल्यानंतर त्या मुलांच्या आणि पालकांच्या प्रतिक्रिया पाहून योजनेचे फलित झाल्याचा आनंद वाटतो, असे केळकर यांनी सांगितले.विविध स्तरातून या अनोख्या योजनेचे कौतुक होत आहे. या योजनेचा लाभ १,४६० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, माजिवडा, कोपरी, मुंब्रा, कळवा, राबोडी, श्रीरंग सोसायटी, उथळसर, डॉ. आंबेडकर रोड, महागिरी, नौपाडा, पाचपाखाडी, चंदनवाडी, खोपट, टेंभीनाका अशा सर्वच भागातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.शाळा सुरू होईपर्यंत योजनाजोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाहीत, तोपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याची माहिती ह्यजागरह्णचे समन्वयक विनोद पितळे यांनी दिली.
गरजू विद्यार्थ्यांसाठी असाही ज्ञान 'जागर'; १,४६० विद्यार्थ्यांना दरमहा मोफत नेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 12:24 AM