ठाणे : हिंदी भाषी एकता परिषदेतर्फे शनिवार २७ जानेवारी २०२४ रोजी सायं. ७.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे ३० वे राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या वर्षीच्या कार्यक्रमात डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्य रत्न पुरस्कार, कवी व ज्येष्ठ पत्रकार हरी मृदुल, महाराणा प्रताप शौर्य मरणोत्तर पुरस्कार भारतीय लष्करातील शहीद, नाईक सुधाकर भट, प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी “कै.ॲ. बी.एल.शर्मा स्मृती पुरस्कार” देखील दिला जाणार असून तो वानिवृत्त पोलीस अधिकारी बाबा जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या संमेलनाचे संयोजक ॲड. दरम्यान सिंह बिष्ट, सहसंयोजक अरुण जोशी तर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक ओमप्रकाश शर्मा आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव आणि मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. सुदीप पासबोला, अॅड. रविप्रकाश जाधव, अध्यक्ष, उद्योगपती अजिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये हास्यसम्राट शशिकांत यादव, कविता तिवारी (लखनौ), शंभू शिखर (नवी दिल्ली), प्रियांशु गजेंद्र (बाराबंकी), पार्थ नवीन (जयपूर), मुन्ना बॅटरी (मंदसौर), साक्षी तिवारी (उत्तर प्रदेश) इत्यादी कवी आपल्या कविता पठण करणार आहेत.