मुंब्राः येथील कौसर बानो शहा या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. ती रशिद कम्पाउंड परिसरातील रिजवान चाळीत राहात होती. कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्या एका नातेवाइकाच्या मरणोपरांत्त (चाळीसावा) विधीसाठी मुंबईतील कुर्ला येथे गेले होते. तेथे न गेलेली कौसर घरात एकटीच होती. रात्री उशिरापर्यंत तिने दरवाजा न उघडल्यामुळे याबाबतची माहिती बाजूला राहात असलेल्या महिलेने तिच्या पालकांना दिली. त्यानंतर, ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे.
मुंब्य्रात अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:42 AM