लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजाराला जिल्ह्यात ऊत आला होता. त्याला आळा घालण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत इंजेक्शनचा पुरवठा सुरू केला आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाने जिल्ह्यातील रुग्णालयांना तब्बल ५१ हजार ६८५ रेमडेसिविरचा शुक्रवारपर्यंत पुरवठा केला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली होती. यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. याचा गैरफायदा घेऊन काहींनी मनमानी किमतीला इंजेक्शन विकले. रेमडेसिविर इंजेक्शनचा बाजारात होणारा पुरवठा थांबवून जिल्हा नियंत्रण कक्षाने तो स्वनियंत्रणात घेतला. जिल्ह्यातील महापालिकानिहाय रुग्णालयांना गेल्या २० दिवसांपासून इंजेक्शनचा पुरवठा सुरू केला आहे. आतापर्यंत ५१ हजार ६८५ इंजेक्शन रुग्णालयांना पुरवण्यात आली आहेत. यातील दोन हजार २६० इंजेक्शनचा २२६ रुग्णालयांना शुक्रवारी पुरवठा केला आहे.
गेल्या एप्रिल महिन्यातील १४ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील रुग्णालयांनी ७९ हजार ८१९ रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली होती. त्यापैकी जिल्ह्याला ३९ हजार ६४१ इंजेक्शन्सचा कंपनीकडून पुरवठा झाला. यातून रुग्णालयांना ३७ हजार २८१ इंजेक्शन्सचा पुरवठा झाला. उर्वरित एक हजार ५५२ इंजेक्शन आपत्कालीनप्रसंगी इतरत्र वाटप झाले आणि ८०८ इंजेक्शनचा साठा राखीव ठेवला. या इंजेक्शन्ससह आतापर्यंत रुग्णालयांनी एक लाख एक हजार ७२० इंजेक्शन्सची मागणी केली आहे. यापैकी तब्बल ५१ हजार ६८५ चार इंजेक्शनचा पुरवठा झालेला आहे. यामध्ये इतर वाटपासह राखीव साठ्याचा समावेश आहे.
------------ पूरक जोड आहे.
...........
वाचली