ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील स्वत:च्या प्लान्टमधून १५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने येथील ऑक्सिजनचे बेड दोन दिवसात सुरु होणार आहेत. त्यात आता लिंडे कंपनीकडून देखील १५ टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेकडे हा अतिरिक्त साठा उपलब्ध होणार आहे. अतिरिक्त ऑक्सीजन साठा उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के हे लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. गुरुवारी पुन्हा लिंडे कंपनीने ठाणो शहरास अतिरिक्त १५ टन ऑक्सीजन येत्या दोन दिवसात उपलब्ध करु न देणार असल्याचे त्यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत नमूद केले. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी लिंडे कंपनीच्या व्यवस्थापनाशी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी महापालिकेस अतिरिक्त १५ टन ऑक्सिजन पुरविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता ठाणो महापालिकेस अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. ठाणे शहरात ऑक्सिजन पुरवठा अपुरा पडत होता, तसेच काही रुग्णालये ही ऑक्सीजन नसल्यामुळे सुरू करता येणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर महापौर म्हस्के हे ऑक्सिजन उपलब्ध होणेकरिता लिंडे कंपनीसोबत सतत पाठपुरावा करीत होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी ठाणो महापालिकेस १५ टन ऑक्सीजनचा अतिरिक्त पुरवठा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाण्यातील कोविड बाधित रुग्णांना आता लवकर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या पार्कीग प्लाझा येथील रु ग्णालय येत्या चार दिवस कार्यान्वित होणार असून निश्चितच कोरोनाबाधित रु ग्णांना उपचार घेणो सोईचे होणार असल्याचे म्हस्के यांनी नमूद करत लिंडे कंपनीने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
खासगी कोवीड रुग्णालयांना सुरळीत होणार ऑक्सीजनचा पुरवठा ठाणे महापालिकेच्या दोन कोवीड सेंटर पाठोपाठ आता शहरातील ३९ खाजगी कोवीड रुग्णालयांना देखील मागील काही दिवसापासून ऑक्सिजनचा पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत होता. परंतु खाजगी रुग्णालयांना ज्या कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्या कंपनीवाल्यांशी देखील चर्चा झाली असून त्यांनी देखील खाजगी रुग्णालयांना सुरळीत पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले आहे.(संदीप माळवी - उपायुक्त, ठामपा)