उल्हासनगर : लाल रंगाचे संविधान हाती घेतल्यास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादी ठरविले आहे. मात्र देशासाठी लाल रंगाचे संविधान हाती घेतले असून फडणवीस यांनी मला अटक करावी, असे आवाहन नेत्या सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच कलानी कुटुंबानी खूप सोसले असून त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यास शनिवारी झालेल्या सभेत केले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील स्काय डोम सभागृहात शरद पवार गटाच्या सभेचे आयोजन केले होते. सभेला पक्ष नेत्या सुप्रिया सुळे तब्बल ४ तास उशिरा आल्याने, भाषणापूर्वी अर्धा हॉल खाली झाला होता. शहरांत नियमित पाणी पुरवठा, प्रशस्त रस्ते, स्वच्छता आदीचे आश्वासन पक्षाचे उमेदवार ओमी कलानी यांनी केले. तर सुप्रिया सुळे यांनी शहर व महाराष्ट्र विकासासाठी कलानी यांच्या पाठीमागे राहण्याचे आवाहन केले. तसेच राहुल गांधी यांनी हातात लाल रंगाचे संविधान हातात घेतल्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद दिसला. यावेळी सुळे यांनी लाल रंगाचे संविधान पुस्तकं हातात घेऊन, मी नक्षलवादी झाली का? असे सांगून फडणवीस यांना अटक करण्याचे आवाहन केले. तसेच महाआघाडी लाडक्या बहिणीसाठी महालक्ष्मी योजना सुरु राहणार असून १५०० एवजी ३ हजार दरमहा देणार आहे. असे आश्वासन सुळे यांनी दिले.
ठाणे जिल्हा व महाराष्ट्रात महिलावरील अत्याचारच्या घटनेत वाढ झाली असून पक्षाचे उमेदवारी ओमी कलानी व पंचम कलानी यावर अंकुश आणतील. अशी आशा व्यक्त केली. सभेला काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे, ओमी कलानी, पंचम कलानी, मनोज लासी यांनी मार्गदर्शन केले. सभेला उशीर झाल्याने, सभेतुन महिलांनी काढता पाय घेतला होता.