भार्इंदर : व्हॅलेन्टाइन डे असो की आधीचा आठवडा प्रत्येक जण आपल्या परीन ेप्रेम व्यक्त करण्याची संधी शोधत असतो. भार्इंदरच्या एका वृद्ध दाम्पत्याने पायाच्या दुखर्या नसांची शस्त्रक्रिया करत वेदनामुक्त होत व्हॅलेन्टाइनचा आनंद लुटला. शैलेश मेहता (५६) व कश्मिरा मेहता (५३) यांना वर्षभरापासून व्हेरिकोज व्हेनचा त्रास होता. पायांची हालचाल मंदावल्याने घराबाहेर पडण्यासाठी त्यांना मदतनीसाची आवश्यकता भासे. त्यामुळे ते सर्वस्वी मुलांवर अवलंबून होते. दरवर्षी हे दाम्पत्य मुलाबाळांसह कुटुंबातील व्यक्तींवर प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करत. भेटवस्तू, शॉपिंग, सिनेमा व हॉटलमध्ये जेवणाचा बेत आखत. यंदा पायाच्या दुखण्यामुळे या आनंदाला मुकणार असे त्यांना वाटत होते. पण लेसर तंत्राचा वापर करत शस्त्रक्रिया केली, तर व्हॅलेन्टाइपर्यंत आराम मिळेल आणि चालता येईल, असा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला. त्यानुसार ४ फेब्रुवारीला दोघांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. ते दोघेही आता व्हॅलेन्टाइनचा आनंद लुटण्यास सज्ज झाले आहेत. (प्रतिनिधी)
व्हॅलेंटाईननिमित्त एकत्र शस्त्रक्रिया
By admin | Published: February 14, 2017 2:50 AM