ठाणे : राबोडीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर या परिसरातील सर्व जुन्या आणि धोकादायक इमारतींचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. येत्या दोन आठवड्यांत हा सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून यामध्ये बहुतांश इमारतींमध्ये भाडेकरू आणि आर्थिक क्षमता नसलेले कुटुंबीय राहत असल्याने या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटदेखील होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेही अशा घटना घटना होत असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.राबोडी भागातील अमर सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग खाली कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. सुरय्या अक्र म शेख (४५) ही महिला यामध्ये गंभीर जखमी झाली होती. ४५ वर्ष जुन्या आलेल्या अमर सदन या इमारतीमध्ये ही घटना घडली होती. राबोडी परिसरात केवळ अमर सदन ही एकच धोकदायक इमारत नसून यासारख्या अनेक इमारती आहेत. या सर्व धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची वेळ आली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यादृष्टीने या सर्व इमारतींचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक धोकादायक आणि जुन्या इमारती या उथळसर भागात असून या सर्व इमारतींचे फेरसर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. हा सर्व्हे येत्या दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. हा सर्व्हे झाल्यानंतर या परिसरातील धोकादायक इमारतींची यादी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे पाटोळे यांनी स्पष्ट केले आहे .यावर्षी जून महिन्यात धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला असून यामध्ये तब्बल १२५ धोकादायक इमारती या एकट्या उथळसर प्रभागात असल्याचे उघड झाले आहे. ४ हजारांपेक्षा अधिक रहिवासी या सर्व इमारतींमध्ये राहत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.उथळसर प्रभागातील धोकादायकइमारतींची संख्या :१२५इमारतींमध्ये राहणाºया रहिवाशांची संख्या : ४०००शहरातील धोकादायक इमारतींची आकडेवारीअधिकृत धोकादायक इमारतींची संख्या : ५०९अनधिकृत धोकादायक इमारतींची संख्या : ३,९९८
राबोडीतील धोकादायक इमारतींचे फेरसर्वेक्षण, ठाणे महापालिकेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 1:21 AM