शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

लॉ कॉलेजच्या नावाखाली सर्वेक्षण

By admin | Published: January 14, 2017 6:02 AM

उत्तन-गोराई येथील विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर

भार्इंदर : उत्तन-गोराई येथील विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर गोराई येथील प्रस्तावित लॉ कॉलेजसाठी ६० एकर जमीन निश्चित केली आहे. परंतु, त्या नावाखाली थेट २०० एकर जमिनीचे सर्वेक्षण एमएमआरडीएकडून होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी गोराईकरांनी गुरुवारी जामदारपाडा येथे निदर्शने केली. दरम्यान, आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या विकास आराखड्याला मे २०१६ मध्ये मंजुरी दिल्यानंतर १२ जून २०१६ मध्ये २०० एकर जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी सर्वेक्षण न करता २८ जूनला सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले. त्या वेळी ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी कंबर कसली होती. परंतु, तेव्हाही अधिकारी सर्वेक्षणासाठी आले नाहीत. १६ सप्टेंबरला एमएमआरडीएने ग्रामस्थांना नोटिसा बजावल्या. त्यालाही ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार विकास आराखड्यात तेथील ६० एकर जागा लॉ कॉलेजसाठी निश्चित केल्याचे सांगून त्याचेच सर्वेक्षण होत असल्याचे सांगण्यात आले. भूमिपुत्रांना सरकारने हटवण्याचा डाव रचल्याने होणारे सर्वेक्षण बेकायदा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ९ जानेवारीला सर्वेक्षण होणार होते. त्या वेळीही परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.परंतु, अधिकारीच न आल्याने तो बारगळला. बुधवारी एकाच कुटुंबाला सर्वेक्षणाची नोटीस बजावली. इतरांना मात्र नोटीस न बजावता त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण होणार असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली.(प्रतिनिधी)