शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गोळी दुस-याने झाडल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 2:50 AM

कोणत्याही रिव्हॉल्व्हरमधून एकाच वेळी तीन फायर होणे अशक्यच आहे. पिस्तूलमधूनही सलग सहा राउंड फायर होतील. पण, प्रत्येक वेळी ट्रिगर दाबणे आवश्यक आहे.

जितेंद्र कालेकरठाणे : कोणत्याही रिव्हॉल्व्हरमधून एकाच वेळी तीन फायर होणे अशक्यच आहे. पिस्तूलमधूनही सलग सहा राउंड फायर होतील. पण, प्रत्येक वेळी ट्रिगर दाबणे आवश्यक आहे. त्यामुळेच ठाणे पालिकेचे ठेकेदार संकेत जाधव यांच्या आत्महत्येतील संभ्रम पोलीस अधिकाºयांसह पालिकेतही कायम आहे.मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आयुध कार्यशाळेतील अधिकारी म्हणाले, खिशात मावणारे किंवा कंबरेला ठेवण्यात येणाºया कोणत्याही रिव्हॉल्व्हरने किंवा पिस्तूलने गोळी झाडायची झाल्यास प्रत्येक वेळी ट्रिगर दाबावाच लागतो. संकेत जाधव यांनी पहिली गोळी झाडल्यानंतर दुसरी आणि तिसरी गोळी झाडण्यासाठी त्यांना तितके अवसान असेल का? की त्यांची इच्छाशक्ती तीव्र होती? समजा, याही गोष्टी शक्य नसतील, तर मग त्यांच्यावर अन्य कोणी गोळी झाडली का, असे अनेक प्रश उपस्थित झाले आहेत.स्वयंचलित शस्त्रांमध्ये ते चालवणाºयाचे बोट जोपर्यंत ट्रिगरवर राहते, तोपर्यंत मॅगझिनमधील सर्व काडतुसे रिकामी होतात, असेही या अधिकाºयाने सांगितले.एमपी अर्थात अ‍ॅटोमेटीक मशीन पिस्तूल एक फुटाचे असते. त्यातूनही एकाच वेळी २० काडतुसे फायर होतात. कार्बाइन हेही स्वयंचलित असल्यामुळे एकाच वेळी त्यातून ३० काडतुसे बाहेर पडतात. याउलट, रिव्हॉल्व्हर असो किंवा अ‍ॅटोमेटीक रिव्हॉल्व्हर यासाठीही ट्रिगर दाबणे आवश्यक असते. फक्त रिव्हॉल्व्हरसाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, तर पिस्तूल वापरताना तितकी मेहनत घ्यायची गरज नसते.एकाच वेळी पिस्तूलमधूनही तीन वेळा गोळी झाडणे शक्य होत नाही. आत्महत्या करणाºयालाही तिचाही ट्रिगर तीन वेळा दाबावाच लागेल, असे ठाणे मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.ठाण्यातील ‘हुमणे आर्म्स’ या शस्त्रास्त्र विक्री करणाºया दुकानातील विक्रेते दिलेश अजिंक्य म्हणाले, पिस्तूलमधून एक गोळी फायर केल्यानंतर ती बाहेर येते. त्याच वेळी दुसरी आपोआप चेंबरमध्ये जाते. एकदा ती लोड केल्यानंतर सर्व राउंड फायर होऊ शकतात. इच्छाशक्ती तीव्र असेल, तरच अशा वेळी एकापेक्षा अधिक गोळ्या फायर होण्याची शक्यता अधिक असते.‘‘संकेत जाधव यांच्या घटनेत त्यांनी बसून स्वत:वर गोळी झाडली. तीच जर उभे राहून गोळी झाडली असती, तर मात्र पहिल्याच गोळीमध्ये ते कोसळले असते. याशिवाय, त्यांनी छातीवर गोळी झाडली. तीच जर डोक्यावर झाडली असती, तर त्यांना दुसरी गोळी झाडण्याचे कसलेच अवसान राहिले नसते, असेही एका वरिष्ठ अधिकाºयाने मत व्यक्त केले.’’जाधव यांची घटना ‘व्होलिशनल अ‍ॅक्ट’जाधव यांच्या आत्महत्येची घटना म्हणजे ‘व्होलिशनल अ‍ॅक्ट’चा एक प्रकार असू शकतो, असे मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाच्या एका तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले. तीव्र इच्छाशक्ती असेल तर अगदी ठरवून अशा आत्महत्येसारखा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे अगदी हृदयात गोळी लागली तरी किंवा छोट्या मेंदूच्या वरच्या भागाला गोळी लागली तरी ‘व्होलिशनल अ‍ॅक्ट’ (मरणास कारणीभूत होईल, इतकी जखम होऊनही लोअर लेव्हलला जाऊन शरीराकडून अशी कृत्ये होणे) याशिवाय, गोळी लागल्यामुळे हायपर टेन्शनमधूनही मरणाची उदाहरणे आहेत. पण, डिटरमाइंड म्हणून मरायचेच आहे, असा निर्धार केल्यानंतरही पुन्हा मेंदूकडून आदेश जाऊन पुन्हा ट्रिगर दाबण्याची प्रक्रिया होऊ शकते. ‘कॅडवरीझ स्पाझम’ या अन्य प्रकारामध्ये अचानक मृत्यू आल्यानंतर ज्या बोटाने ट्रिगर दाबला गेला, त्यात शरीराचे स्रायू पुढेमागे होत असल्यामुळे त्यातही पुन्हा त्याच बोटाने ट्रिगर दाबण्याची शक्यता आहे. एका घटनेत तर दोन गोळ्या पाठीवर लागूनही दुचाकीवरून काही अंतर एक तरुण गेल्याचेही उदाहरण या वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले. ८० ते ९० टक्के घटनांमध्ये पहिल्याच गोळीत जागीच मृत्यू होतो. पण, १० ते २० टक्के घटनांमध्ये जीव न जाताही पुढील कृत्ये होत राहतात. इतिहासातले एक उदाहरण म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. शिरच्छेद होऊनही ४० ते ५० लोकांना त्यांनी मारल्याची आख्यायिका सांगितली जाते.हाही डिटरमाइंड आणि ‘व्होलिशनल अ‍ॅक्ट’ प्रकार आहे. अगदी तसाच जाधव यांचाही प्रकार असण्याची शक्यता या वैद्यकीय अधिकाºयाने वर्तवली आहे.