राहुल वाडेकर / विक्रमगडविक्रमगड -चिखलपाडा येथील गौरी राहुल वाघ (२०) ही महिला विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी गेली असता त्या दरम्यान बाळाचा मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे.याबाबत श्रमजीवी संघटनेने संस्थापक विवेक पंडित यांनी तत्काळ विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून आढावा घेतला. त्यामध्ये त्यांना हा मृत्यू संशयास्पद वाटल्याने यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचे त्यांनी पत्रकांना सांगीले,तर याबाबत आम्ही पोलिसांत एडीआर दाखल करुन बाळाचे शव जे.जे रुग्णालयात पाठवून तेथे मृतदेहाची तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र जे जे रुग्णालयाचा रिपोर्ट आल्यानंतर खरी परिस्थित समोर येणार आहे.काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास गौरीच्या पोटात कळा येऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिची ही पहिलीच डिलिव्हरी असून तरीही डॉक्टरांनी दिलेल्या तारखेपेक्षा ८ दिवस उशिराने ती झाली.त् यावेळेस लखनौ येथून आलेल्या व दोन दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या डॉ. जस्मीन गुप्ता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (एम.बी.बी.एस) तिला तपासून तिच्या गर्भाशयाचे तोड उघडले नसल्याचे सांगितले व गौरील अॅडमीट केले. रात्री १२ वाजताच्या सुमारास गर्भाशयाचे तोंड उघडले, मात्र डिलेव्हरी होत नव्हती. पहाटे ४.३० वाजताचे सुमारास डिलेव्हरी करीता काही प्रोग्रेस दिसत नसल्याने डॉक्टरांनी तिला रेफर करण्यास सांगीतले.त्यानंतर बरोबर एक तासांनी ५.३० वाजता डिलेव्हरी झाली व गौरीच्या नातेवाईकांनी सांगितल्या प्रमाणे बाळ डिलेव्हरी झाल्यानंतर एकदा रडले होते.तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार बाळ रडलेच नाही.त्यानंतर डॉ.सुनिल भंडागे यांनी बाळाला तपासले तेव्हा ते मृत्यू पावलेले होते. बाळाची डिलेव्हरी नॉर्मल झाली व त्याचे वजन देखील जवळ जवळ पावणेतीन किलो होते असे असतांनाही बाळ मृत्युमुखी का पडले असा सवाल बाळाचे नातेवाईक करीत आहे.(वार्ताहर)
विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: January 13, 2017 5:55 AM