शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

आपला दवाखान्याच्या कंत्राटात घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करा; भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:38 AM

चूक दुरुस्त करण्याची महापौरांची ग्वाही

ठाणे : प्रशासकीय घोळामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या आपला दवाखाना या महत्त्वांकाक्षी प्रकल्पाला अखेरची घरघर लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ही योजना सुरू करताना जॉइंट व्हेंचरमध्ये असलेल्या कंपनीला हे काम देणे अपेक्षित होते; परंतु महापालिकेच्या प्रशासकीय घोळामुळे या कामाचे कार्यादेश जी कंपनी निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. तिला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे ही प्रशासकीय चूक करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करावे, अशी मागणी भाजपने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. सत्ताधारी शिवसेनेने या प्रकरणात तांत्रिक चुका झाल्या असल्याने त्या दुरुस्त करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.दोन वर्षांपूर्वी आपला दवाखान्याची सुरुवात ठाण्यात झाली होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांत २५ दवाखाने सुरू झाले आहेत; परंतु आता निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे समोर आले आहे. ज्या कंपनीला जॉइंट व्हेंचरमध्ये हे काम लागले होते. तिला ते न देता जी कंपनी यात सहभागी झालीच नव्हती अशा कंपनीला महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने कार्यादेश दिल्याचे समोर आले. त्यामुळे जॉइंट व्हेंचरमधील एका कंपनीने महापालिकेला नोटीसदेखील बजावली आहे. त्यानंतर आता भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्रव्यवहार करून असा घोळ घालणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनीदेखील कोरोना काळात सर्व ठराव हे बेकायदेशीर पद्धतीने झालेले आहेत. त्यामुळे त्या सर्वच प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात योग्य तो न्याय निवाडा झाला नाही तर त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला....तर न्यायालयात जाऊजॉइंट व्हेंचरमधील एक कंपनी असलेली इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भात आम्ही महापालिकेला नोटीस दिलेली आहे. त्याला आता १५ दिवस उलटून गेलेले आहेत. पालिकेने ही चूक दुरुस्त करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.तांत्रिक चुका दुरुस्त करून ‘आपला दवाखाना’ सुरूच ठेवू - नरेश म्हस्के‘आपला दवाखाना’ हा एक चांगला उपक्रम आहे. ज्यामधून ठाणेकरांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे मिळत आहेत. त्यामुळे याबाबत ज्या काही तांत्रिक चुका झाल्या असतील त्या दूर करून आपला दवाखाना सुरूच ठेवणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.