शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रुंदीकरणाला स्थगिती

By admin | Published: December 06, 2015 1:26 AM

रस्ता रुंदीकरणाच्या दुसऱ्या दिवशी १७ दुकाने तोडण्यास न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती मिळविण्यात व्यापारी यशस्वी झाले आहेत. तर, दुसरीकडे पुढील कारवाई सुरूच

- सदानंद नाईक,  उल्हासनगर

रस्ता रुंदीकरणाच्या दुसऱ्या दिवशी १७ दुकाने तोडण्यास न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती मिळविण्यात व्यापारी यशस्वी झाले आहेत. तर, दुसरीकडे पुढील कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांत ५०पेक्षा अधिक दुकानांवर कारवाई होऊन बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वत:हून पाडकाम सुरू केले आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पालिकेने मोठ्या धूमधडाक्यात सुरू केले. शिवाजी चौक परिसरातील मनीष इलेक्ट्रॉनिक मार्केट, कराची हॉटेल, मोहन इलेक्ट्रॉनिक दुकान, बॅण्ड बॉक्स इमारत, जयशंकर हॉटेल, दीपक बार, विजय सेल्स आदींवर पाडकाम कारवाई केली आहे. व्यापाऱ्यांचा विरोध मावळला असून, त्यांनी स्वत:हून दुकानांवर कारवाई सुरू केली. १००ऐवजी ८० फुटी रस्ता रुंदीकरणाला महासभेने मंजुरी देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, प्रस्ताव शासनाने विखंडित करताच पालिकेने रुंदीकरणाचे काम सुरू केले.पर्यायी जागेची मागणी उपमहापौर पंचशीला पवार यांनी पुढाकार घेऊन रस्ता रुंदीकरणात १०० टक्के दुकानासाठी व ज्यांच्याकडे सनद व बांधकाम परवाना आहे, अशा व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. आमदार ज्योती कलानी, माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह सेना-भाजपा पदाधिकारी, इतर पक्ष नेते व व्यापारी मुख्यमंत्र्यांची दोन दिवसांत भेट घेऊन पर्यायी जागेची मागणी करणार आहेत. निधीअभावी रस्ता लटकणार एमएमआरडीएने ३ वर्षांपूर्वी महामार्गाचे काम हाती घेतले होते. पालिकेने रस्ता रुंदीकरण न केल्याने ३१ मार्च २०१५ रोजी रस्त्याच्या कामाची मुदत व निधी संपला आहे. अंबरनाथ ते वांगणीदरम्यानच्या रस्त्यावर संपूर्ण निधी खर्च झाल्याचे दाखविले आहे. उर्वरित रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले असून, त्यासाठी विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. १७ दुकानांना न्यायालयाची स्थगिती उच्च न्यायालयाने रुंदीकरणाच्या आड येणारी १७ दुकाने तोडण्यास दुसऱ्याच दिवशी तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने रस्त्याचे काम रखडणार असून, इतर व्यापारी त्यांचा कित्ता गिरविणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच दुसऱ्या एका निर्णयात न्यायालयाने एका दुकानालाही स्थगिती दिली आहे. मात्र, शुक्रवारीच ते दुकान कारवाईत जमीनदोस्त झाले आहे.गटारासाठी पालिकेचा राखीव निधी : रुंदीकरणानंतर रस्ताबांधणीचे काम होणार, ही शक्यता लक्षात घेऊन पालिकेने रस्त्याखालील भुयारी गटार व रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे नाले बांधण्यासाठी राखीव निधी ठेवल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे.एमएमआरडीए आयुक्त यू.पी.एस. मदान यांना साकडेपालिका आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता भरत भाटिया, आमदार ज्योती कलानी, महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार, स्थायी समिती सभापती जया माखिजा यांच्यासह पक्ष पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांची ३ डिसेंबर रोजी भेट घेऊन कर्जत-कल्याण महामार्ग रुंदीकरण होताच तो तत्काळ बांधण्याची मागणी केली आहे. त्यांनीही रस्ताबांधणीला प्राधान्य देणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. उल्हासनगर-अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदलठाणे : अनधिकृत बांधकामे तोडताना कल्याण-अंबरनाथ रोडवरील उल्हासनगर शहर परिसरातील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या रोडवरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यानुसार, जड व अवजड वाहनांना वालधुनी ब्रीजच्या पुढे महाराणा प्रताप चौक येथून जाण्यास सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्गाने ही वाहने वालधुनी ब्रीज महाराणा प्रताप चौक उजव्या बाजूस वळून चक्कीनाका, नेवाळी नाकामार्गे इच्छितस्थळी जातील. रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस वाहने तसेच कारवाईसाठीच्या वाहनांना ही अधिसूचना लागू राहणार नाही.