नारायण जाधवठाणे : राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी तर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागाच्या २१ जून २०१८ च्या निर्णयानुसार पूर्वपरवानगीशिवाय आपल्या कामाच्या ठिकाणाचे मुख्यालय सोडल्यास किंवा महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारणाºया कर्मचारी आणि अधिकाºयांवर एका महिन्याच्या आत निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत....तर वरिष्ठ अधिकारी जबाबदारडॉक्टर वा कर्मचाºयांच्या अनुपस्थितीअभावी ग्रामीण भागात प्रसुती झालेल्या अवघडलेल्या महिला, सर्प, विंचु किंवा अपघातग्रस्त रुग्ण यांचे तर यामुळे खूपच हाल होतात. परंतु, शासनाच्या नव्या आदेशांमुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.दोषींवर अशी कारवाई केली नाही तर त्यांना पाठिशी घालणाºया संबधित अधिकाºयास जबाबदार धरण्यात येईल,असेही बजावण्यात येणार आहे.यांना बसणार फटकाआरोग्य विभागाच्या आदेशाचा दणका ठाणे जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १० रुग्णालये, १ विशेष रुग्णालये, ८ वाखाने, १ प्रसुतीगृह,३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८७ उपकेंद्रातील २३४ डॉक्टर, ६०० परिचारीकांसह इतर कर्मचाºयांना बसणार आहे.ठाणे हा सर्वात जास्त नागरिकरण झालेला राज्यातील मोठा जिल्हा असून जिल्ह्यात सहा महापालिकांसह ग्रामीणही मोठा आहे. यात शहापूर, मुरबाड सारखे आदिवासी तालुकेही आहेत.येथील दुर्गम भागातील अनेक दवाखाने, ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर व अनेक कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडतात. काही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली सारख्या शहरी भागात राहून येजा करतात.यात बºयाचदा ते जिल्हारूग्णालय, तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात हजर नसतात. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडतात, सुटीत परदेशात जातात. यामुळे अनेकदा आरोग्यसेवेचे संपूर्ण नियोजन कोलमडते.पावसाळ्यात तर ग्रामीण भागातील रूग्णांचे अतोनात हाल होतात. ठाणे हा अतिवृष्टीचा जिल्हा असून येथे १२०० ते २००० मिमीपर्यंत वार्षिक पाऊस पडतो. यामुळे साथीचे आजार येथे नेहमीच डोकेवर काढतात.एका महिन्याच्या आत होणार कारवाईअनेकदा डॉक्टरच रुग्णालयात नसल्याने रुग्ण दगावतो. किंवा त्यांचे आजार बळावतात. यामुळे आरोग्य विभागाने हे आदेश काढले आहेत. यानुसार अशा कामचुकार कर्मचाºयांच्या अनुपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना पाठवायचा आहे. त्यानंतर अशा कर्मचाºयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांना एका महिन्याच्या आत निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावयाची आहे.
परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबनाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 1:57 AM