शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

१६० गुन्हेगारांवर तडीपारीची तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:01 AM

कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

- सचिन सागरे कल्याण : कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. वारंवार गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या १६० जणांच्या तडीपारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. परिमंडळ ३ मध्ये ९० जणांवर तर परिमंडळ ४ मध्ये ७० जणांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.समाज विघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यात कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार तडीपारीची कारवाई केली जाते. ज्या व्यक्तींपासून लोकांना भीती असेल किंवा धोका निर्माण होत असेल त्यांना कलम ५५ अन्वये; ज्यांनी मालमत्तेसंदर्भात गुन्हे केलेले असतील, मारामारी, हत्येचे गुन्हे केले असतील त्यांना कलम ५६ अन्वये आणि न्यायालयाने शिक्षा केलेले, काळाबाजारासंदर्भात गुन्हे केलेले असतील त्यांना कलम ५७ अन्वये तडीपार केले जात असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अंतर्गत कल्याण परिमंडळ ३ आणि उल्हासनगर परिमंडळ ४ ही दोन परिमंडळे येतात. या दोन्ही परिमंडळातील पोलीस ठाण्याच्या हददीत मारामाºया, सोनसाखळी चोरी, गुंडांच्या टोळ्या, सराईत गुन्हेगारी, खंडणी गोळा करणारे, त्यांना मदत करणारे, घातक शस्त्राने गुन्हे करणाºया गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. तडीपारीच्या १६० प्रस्तावांसोबतच काही जणांना एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्यात येणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.दरम्यान, कल्याण-डोंबिवली शहरातील ४ टोळ्यांमधील २० जणांवर मकोकांतर्गत नुकतीच कारवाई करण्यात आली असून, २३ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्याचबरोबर बेकायदा अग्निशस्त्रांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत २१ अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. गुंडांना तडीपार करण्याची मोहीम ठाण्यातही राबवण्यात आली होती. या कारवाईमध्ये सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस