ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मागील दहा दिवसांत स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातही या आजाराने दोन रुग्ण दगावले होते. या आजाराने जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा बळी घेतला असून, बाधितांचा आकडा ५७च्या घरात गेला आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवावर या आजाराचे सावट निर्माण झाले आहे.ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते २३ आॅक्टोबर २०१७ या दरम्यान स्वाइन फ्लूबाधित ९८२ रुग्ण आढळून आले होते. ५१ जणांचा जिल्ह्यात, तसेच जिल्ह्याबाहेर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या वर्षी सप्टेंबर महिन्यात ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूबाधित रुग्ण आढळून आले. आतापर्यंत बाधितांचा आकडा ५७ वर गेला असून, ठाण्यात १४, कल्याणात १४, नवी मुंबईत १८, तसेच मिरा-भार्इंदरमध्ये ११ बाधित आहेत. उल्हासनगर, भिवंडीत एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने, आतापर्यंत १ लाख ६ हजार ७९४ जणांनी फ्लूची तपासणी केलेली आहे. त्यापैकी ५७ जणांना स्वाइनची लागण स्पष्ट झाले असून, त्यापैकी १८ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. ३३ जण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यूस्वाइन फ्लूने ठामपा हद्दीत गेल्या १0 दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, ते दोघेही ६० वर्षांवरील आहेत. त्यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. गेल्या महिन्यात कल्याण आणि मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत एका स्त्री आणि पुरुषाचा मृत्यू झाला होता.
दहा दिवसांत दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू; नवरात्रौत्सवावर सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:26 AM