ठाणे : मागील काही महिन्यांपासून ठाण्यासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संकट गढद होतांना दिसत आहे. त्यातही ठाण्यात स्वाईनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. घोडबंदर भागात या आजाराचे रुग्ण अधिक आहेत. मात्र या आजाराची लागण ही लहान मुले आणि जेष्ठ नागरीकांना अधिक असल्याची माहिती महापालिकेच्या आकडेवारीवरुन पुढे आली आहे. ० ते ५ या वयोगटातील २७ आणि १२३ जेष्ठांना या आजाराची लागण झाली आहे. ठाण्यात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईनची लागण झाली असून त्यात २०५ महिलांचा तर १७७ पुरुषांचा समावेश आहे.
ठाणे शहरात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यातील ३३८ रुग्णांनी यावर मात केली आहे. ३५ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण १५ मृत्यु झाल्याचे दिसत असून त्यातील ९ मृत्यु हे ठाणे शहरातील असल्याचेही आकडेवारीवरुन दिसत आहे. जून मध्ये अवघे तीन रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये ही संख्या १४५ वर गेली, तर ऑगस्टमध्ये २१५ आणि १४ सप्टेंबर र्पयत १९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण आढळलेल्या रुग्णांमध्ये २०५ स्त्रीयांचा तर १७७ पुरषांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून आले आहे.यांना झाली बाधा
वयोगट - रुग्णांची संख्या
० ते ५ - २७६ ते १० - १३११ ते २० - १५२० ते ३० - ३४३० ते ४० - ५३४० ते ५० - ५७५० ते ६० - ६०६० वयोगटापुढील - १२३-------------------------एकूण - ३८२--------------------------प्रभाग समिती - रुग्ण संख्यादिवा - ०१मुंब्रा - ०२कळवा - २०लोकमान्य - १४माजिवडा - मानपाडा - २०५नौपाडा - कोपरी - २५उथळसर - ५०वर्तकनगर - ४८वागळे - १७