उल्हासनगर : केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ, शेतकरी संघटनांनी भारत बंद घोषणा केली असून, शहर काँग्रेसने पाठिंबा देऊन प्रांत कार्यालयासमोर शुक्रवारी लाक्षणिक उपोषण केले. या वेळी पक्षाच्या नेत्या सुमन अग्रवाल, शहराध्यक्ष रोहित साळवे, पक्ष्याच्या गटनेत्या अंजली साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शहराध्यक्ष रोहित साळवे, पक्षाच्या उल्हासनगर प्रभारी राणी अग्रवाल, गटनेत्या अंजली साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या काळ्या कृषी कायद्यांचा निषेध करण्यात आला. या वेळी पक्षाचे साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, जिल्हा महासचिव तथा अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष दीपक सोनोने, साऊथ ब्लॉक उपाध्यक्ष शैलेंद्र रूपेकर, विद्यार्थी आघाडीचे रोहित ओव्हाळ, सी महेंद्रन आदी पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत कुंभकर्णाची झोप घेत असलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी थाळ्या वाजविण्यात आल्या.
आंदोलनात पक्षाचे माजी शहराध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला, पक्षाचे कार्याध्यक्ष मोहन साधवाणी, प्रवक्ता आसाराम टाक, आझाद शेख, नारायण गेमनानी, युथचे सुशील सैनी, फजल खान, महादेव शेलार, महेश मिरानी, अजीज खान, गणेश मोरे, अनिल यादव, मनोज मिसाळ, प्रवीण वाघमारे, मनीषा महांकाळे, राजेश मल्होत्रा, अनिल हणवते, किशोर सातार्डेकर आदी उपस्थित होते.
........
वाचली.