बदलापूर : कुळगाव- बदलापूर नगरपालिकेचा २०१८-१९ या वर्षासाठीचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. ४६५ कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात एकूण जमा रक्कम ४६५ कोटी ०२ लाख ९२ हजार २५१ रुपये एवढी दाखवली आहे तर एकूण खर्च ४६४ कोटी ३९ लाख ८१ हजार १५२ रु पये दाखवला आहे. अर्थसंकल्पात ६३ लाख ११ हजार ९९ रुपयांची शिलकी दाखवण्यात आली आहे.नगराध्यक्ष विजया राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या वेळी प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी प्रकाश बोरसे व सर्व पक्षीय गटनेते यांच्या हस्ते अर्थसंकल्प नगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पालिकेच्या अंदाजपत्रकात शहराच्या विविध विकास कामांसाठी, शिक्षण, महिला बालकल्याण, मागासवर्गीय कल्याणकारी योजना या सर्वांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकरिता नगरपालिका निधीतून १० कोटी, बाळासाहेब ठाकरे स्मारकाकरिता २ कोटी १० लाख, प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी तसेच नगरपालिका हद्दीतील रिंग रोड असलेल्या आरक्षणामध्ये सायकल ट्रॅक व भुयारी गटार योजनेच्या दुसºया टप्प्याकरिता ३० कोटी ७८ लाख रु पयांची तरतूद के ली आहे. शिरगाव येथे बीओटी तत्वावर नाट्यगृह व स्टेडियम प्रस्तावित केले आहे. त्याकरिता अनुक्र मे २ कोटी व ४ कोटी ९० लाखांची तरतूद केली आहे.
पालिका विद्यार्थ्यांच्या हाती टॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:53 PM