कल्याण : रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. असे असतानाही फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात नसल्याने त्यांना भय राहिलेले नाही. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.पवार यांनी यासंदर्भात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक घेतली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, केडीएमसीचे ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार, फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे, संजय जाधव, सदा कोकणे, प्रशांत माळी आदी उपस्थित होते.रेल्वेस्थानक परिसर तसेच स्कायवॉकव ही फेरीवाल्यांनी व्यापला आहे. त्याचा त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागतो. तसेच काही वाहनचालक त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने पार्किंग करतात. स्टेशन परिसरात बोरगावकरवाडी व दिलीप कपोते वाहनतळ आहे. मात्र, त्याचा वापर न करण्याकडेच अनेक वाहनचालकांचा कल दिसून येतो. रिक्षाचालक स्टॅण्डऐवजी स्थानकाबाहेर चौकात व रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून बेकायदा साइडभाडे भरतात. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे, याकडे आमदारांनी लक्ष वेधले आहे.>स्थानक परिसरातील रिक्षाचालकांवर बडगाकल्याण : रेल्वेस्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात नागरिकांकडून सतत तक्रारी येत आहेत. मात्र, आ. नरेंद्र पवार यांनी सोमवारी अधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर कल्याणच्या सहायक पोलीस आयुक्त आणि महापालिकेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास संयुक्त कारवाई केली. यादरम्यान फेरीवाल्यांवर, पदपथावरील अतिक्र मण आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
फेरीवाल्यांविरोधात कारवाई करा, नरेंद्र पवार यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:44 AM