शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

इतिहास बदलणाऱ्यांवर कारवाई करा-मराठा नेते

By admin | Published: May 24, 2017 12:50 AM

इंग्रजी माध्यमाच्या आयसीईएसच्या अभ्यासक्रमात तानाजी मालुसरे यांचेआडनाव बदलून सिंग असे दाखवून चुकीचा इतिहास सांगितला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : इंग्रजी माध्यमाच्या आयसीईएसच्या अभ्यासक्रमात तानाजी मालुसरे यांचेआडनाव बदलून सिंग असे दाखवून चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्यावतीने चुकीचा इतिहास लिहीणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी वसईच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.आपल्या अद्भुत पराक्रमाने कोंढाणा किल्ला जिंकणाऱ्या तानाजी मालुसरे याचा सिंह असा गौरवपूर्ण उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. मालुसरे धारातीर्थ पडल्यानंतर गड आला पण सिंह गेला अशा शब्दात महाराजांनी दु:ख व्यक्त केले होते. हा इतिहास मात्र आयसीईएसच्या अभ्यासक्रमात बदलण्यात आला आहे. त्याच्या चौथीच्या पुस्तकात कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कसे या प्रश्नावर तानाजी मालुसरे यांचे नाव सिंह होते, असे उत्तर देण्यात आले आहे. मराठ्यांचा इतिहास बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वसई विरार मराठा समाजाने याप्रकाराचा निषेध व्यक्त केला असून राजाराम मुळीक, कुमार धुरी, रत्नदीप बने, विश्वास सावंत, संजय पालव यांनी वसईच्या तहसिलदारांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी मराठ्यांचा इतिहास बदलणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. मराठ्यांचा गौरवशाली दैदिप्यमान इतिहास बदलता कामा नये. जर कुणी असा प्रयत्न करीत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे. इतिहासाचा अभ्यास न करता पाठ्यपुस्तकामध्ये नको तो इतिहास लिहीणे म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांवर चुकीचे संस्कार करून त्यांना चुकीची माहिती देण्यासारखे असल्याचा आरोप मुळीक यांनी केला आहे. यासाठी सरकारने त्वरीत हस्तक्षेप करून अशा पुस्तकांवर बंदी घालण्याचीही मागणी केली.