शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

परस्पर दालन बंद करणाऱ्या  सत्ताधाऱ्यांवर कारवाई करा; मनसेसह बविआची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 5:35 PM

मीरा-भार्इंदर महापालिका हि प्रशासकीय मालमत्ता असतानाही त्यातील दालने परस्पर बंद करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मनसेसह बहुजन विकास आघाडीने अतिरीक्त आयुुक्त माधव कुसेकर यांच्याकडे गुरुवारी लेखी निवेदनाद्वारे केली. 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका हि प्रशासकीय मालमत्ता असतानाही त्यातील दालने परस्पर बंद करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मनसेसह बहुजन विकास आघाडीने अतिरीक्त आयुुक्त माधव कुसेकर यांच्याकडे गुरुवारी लेखी निवेदनाद्वारे केली. 

‘मीरा-भार्इंदर महापालिका करदात्या नागरीकांची, नाही कुणाच्या बापाची’ अशी घोषणाबाजी करीत शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरीक्त आयुक्तांना निवेदन दिले. त्यात पालिकेतील लोकप्रतिनिधींची दालने प्रशासकीय असुन ती कोणत्याही लोकप्रतिनिधींची खाजगी मालमत्ता नाही. ती दालने जनसंपर्क व लोकसेवेकरीता असल्याने ती कार्यालयीन वेळेत नागरीकांसाठी खुली राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले. परंतु, सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करीत असुन त्यांनी परस्पर बंद केलेली दालने लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य असल्याचा आरोप करण्यात आला.सत्ताधाऱ्यांना निवडुन दिलेल्या जनतेचा त्यांनी अनादर केला असुन त्यांनी बंद केलेली दालने त्वरीत खुली करण्यात यावीत. तसेच दालन बंद केल्याने त्यातील कर्मचारी बिनकामाचे ठरल्याने त्या कालावधीतील त्या कर्मचाऱ्यांचे वेतन महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, प्रभाग समिती सभापती, महिला व बाल कल्याण समिती सभापती व उपसभापतींना मिळणाऱ्या भत्यांतून अदा केले जावे, अशी मागणी करीत सुर्वे यांनी लोकशाहीत एकाधिकारशाहीचा अंमल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर प्रशासनाने ठोस कारवाई करावी अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला. मनसेसह बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रशासनाला निवेदन देत सत्ताधाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरMNSमनसे