ठाणे: राज्यातील नऊ सणांसाठी अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दहा हजार रूपयांची उचल मंजूर केली आहे. या आधी केवळ पाच हजार मिळत होते. पण आता त्यात पाच हजारांची वाढ करून ती बिन व्याजी दहा हजार रूपये केली आहे. यासाठी अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याचे गे्रड वेतन ४८०० रूपयेपेक्षा अधिक नसलेल्यांना याचा लाभ घेता येणार आहे. दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोश होशना, बैसाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती), स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, यासाठी बिन व्याजी दहा हजार रूपयांची उचल कर्मचाऱ्याना घेता येणार आहे. ती घेतल्यानंतरच्या पहिल्या वेतनापासून एक हजार रूपये प्रमाणे समान दहा हप्त्यांव्दारे तिची परतफेड होणार आहे.
सणांसाठी कर्मचाऱ्यांना १० हजारांची उचल
By admin | Published: October 30, 2015 11:47 PM