लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कारच्या दरवाजावर थाप मारून काच खाली करण्यास भाग पाडून गाडीतील ंिकमती सामान लुटणाऱ्या टोळीपैकी दोघांनी सुदर्शन निर्मळे (३२, रा. ओवळा, ठाणे) यांच्याकडील मोबाइल हिसकावून पलायन केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मळे हे वागळे इस्टेट येथील एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. ते ८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारने घरी जात असताना मानपाडा ब्रिजवर ते वाहतूककोंडीमध्ये अडकले. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूला सुमारे २६ वर्षीय एका भामट्याने येऊन त्यांना ‘गाडी चलाने नही आती क्या? तू काच निचे कर?’ असे सुनावून त्यांना काच खाली करण्यास भाग पाडले. त्यांनी काच खाली करताच उजव्या बाजूने आलेल्या दुसºया एका सुमारे २७ वर्षीय भामट्याने गाडीच्या काचेवर थाप मारली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडाही केला. नंतर त्यांनी उजव्या बाजूची काच खाली करून आपण काहीच केले नसल्याचे सांगून त्यांनी कार पुढे घेतली.त्याचवेळी त्यांचा ४० हजारांचा मोबाइल एकाने जबरदस्तीने घेऊन तिथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निर्मळे यांनी चितळसर पोलीस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड अधिक तपास करीत आहेत.याआधीही झाल्या अशा घटना : यापूर्वी कासारवडवली, कापूरबावडी, चितळसर तसेच राबोडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही अशाच प्रकारच्या घटना एक महिन्यापूर्वी घडल्या होत्या. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने याप्रकरणी तीन ते चार जणांच्या टोळीला अटकही केली होती. त्यानंतर असे प्रकार बºयापैकी कमी झाले होते. मात्र, पुन्हा ही टोळी सक्रिय झाल्याने वाहनचालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.