कामवारी नदी तसेच शहरात तलावही आहे. त्या पाण्याचा वापर करता येऊ शकेल. मात्र पालिका प्रशासनाकडून योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. जर व्यवस्थित आराखडा तयार करून योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यास पालिकेला अन्य ठिकाणाहून पाणी घेण्याची वेळच येणार नाही.का मवारी नदीकिनारी राहणारे रहिवासी नदीच्या पात्रात स्वच्छतागृहाचे पाणी सोडतात. त्यामुळे कामवारी नदीचे पाणी प्रदूषित झालेले आहे. याच पाण्यात गणेशभक्त मूर्ती विसर्जित करतात. परंतु या मूर्तींमध्ये प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती असल्याने त्या प्लास्टरचा खच नदीपात्रात साचतो. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची क्षमता कमी होते. उन्हाळ्यात अनेकवेळा नदी पात्रातील माती व प्लास्टर काढण्याची मागणी गणेश मंडळ पालिका, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाला करते. परंतु यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. तर शहर व ग्रामीण भागातील डाइंगना कापडावर प्रक्रिया करण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. त्यांना पाणी पुरविण्यासाठीही टँकर लॉबी नदीपात्रातील पाणी सर्रास घेते. त्यामुळेही नदीपात्रातील पाणी कमी होते. शहर आणि ग्रामीण परिसरात नेहमी पाण्याचे संकट असते. परंतु त्यावर उपाययोजना करण्यासाठी नदीपात्राच्या पाण्याचा उपयोग न करता स्टेम अथवा मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी वाढवून मागितली जाते.शहरात पाणी साठविणारे काही तळी नागरिकांनी बुजवून त्यावर झोपडपट्टी वसविली आहे. तर उरलेल्या चार-पाच तळ्यांचे संवर्धन केले जात नाही. शहरात सर्वात मोठा वºहाळातलाव असून त्यातील पाणी शहरातील नागरिकांना पुरविले जात होते. परंतु या तलावातील बांधकामांमुळे पाण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यातच दरवर्षी होणाऱ्या मूर्ती विसर्जनामुळे या तलावातील पाण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे.तालुक्यातील कामवारी नदीवर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे उपविभागातर्फे १७ पक्के बंधारे बांधण्यात आले आहेत. चावे (३ बंधारे), पुंडास (२ बंधारे), सोनटक्का (२ बंधारे),खांडपे (२ बंधारे) असे या गावात दोन पक्के बंधारे आहेत. निवळी, रामवाडी, सावंदे, आवळवट्टे,सावंदे-गोरसई येथे कोल्हापूर टाईप बंधारा, विश्वभारती (सुतगिरणी) खाजगी बंधारा, नदीनाका येथे खाजगी बंधारा आहेत.कामवारी नदीचा प्रवाह हा देपोली येथून पावसाळ्यात सुरू होतो. या प्रवाहाने नदीचे पात्र मोठे होते. त्यामुळे या पात्रातून रेतीही निघते. हा प्रवाह पुढे साक्रोली मार्गे नांदिठणे येथून चावे गावात जातो. या गावातून निघणारा प्रवाह करंजावडे, सुपेगाव येथून आलेल्या प्रवाहास निवळी येथे मिळतो. त्यानंतर हे पात्र पुढे मोठे होऊन सोनटक्का,कशिवली,गोरसईमार्गे शेलार येथे येतो. शेलार-नदीनाका येथील बांधलेल्या धरणावरून हे पाणी उलटून खाडीत मिसळते.नदीतील पाणी पावसाळ्यानंतर संथ होते. हळूहळू हे पाणी जमिनीत जिरल्याने अथवा शेतकºयांनी वापरल्याने मूळ नदी गायब होते. पूर्वी शेतकरी पाण्याचा वापर करीत असतानाही उन्हाळ्यापर्यंत नदीतील पाणी कमी होत नव्हते. आता शेलार भागात नदीतील पाणी पंपाने टँकरमध्ये भरतात आणि रात्रंदिवस येथील पाणीमाफिया परिसरांतील डार्इंगला पुरवितात. डार्इंगमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी भरपूर पाणी लागते. प्रक्रीया झाल्यानंतर झालेले दूषित पाणी नदीच्या पात्रात सोडले जाते.>नदीचे पुनर्जीवन करणे गरजेचे; पाटबंधारे विभागाने लक्ष देणे आवश्यकनदीतील पाणी बारामाही टिकावे यासाठी प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच दरम्यानचे झरे जिवंत केले पाहिजे. ही नदी पुनर्जीवित करण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. पावसाचे पाणी अडविल्यामुळे त्या भागातील विहिरी ना बोअरवेल यांना पाणी लागते. परंतु काही भागात नदीतील दगड खोदल्यानेही प्रवाहास बाधा आली आहे. ही नदी पुनर्जीवित करण्यासाठी लघुपाटबंधारे, जलसंपदा, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण यंत्रणेची मदत घेतली तर हे काम पूर्णत्वास जाईल. तरच या नदीतील पाणी पुढील पिढीला वापरता येईल.>नदी, तलाव संवर्धन प्रकल्पदूषित पाण्याची उगमस्थाने तपासून जलप्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांशी संपर्क साधत जनजागृती केली पाहिजे. तसेच जनसंपर्कातून नागरिकांना जलप्रदूषणाची शास्त्रीय माहिती देत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करुन श्री हालारी ओसवाल कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्यामार्फत डॉ. स्नेहल दोंदे व महापालिका यांच्यावतीने नदी तलाव संवर्धन प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे.>तलावांच्यासर्वेक्षणाची गरजकामवारीमधील गाळ काढण्याचे काम वीस वर्षापूर्वी झाले होते. तर वºहाळा तलावातील प्रदूषण रोखण्याचे काम दहा वर्षापूर्वी झाले. सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने जलचर प्राण्यांवर परिणाम होत आहे. नदी व तलावाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याअंतर्गत नदी तलावांचे सर्वेक्षण झाले पाहिजे. त्यामधील पाण्याची शास्त्रीय तपासणी केली पाहिजे.>नागरिकांना चांगलेदिवस येण्याची शक्यताहा अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने मागील महासभेत मंजुरी दिली आहे. हा अहवाल सरकारला सादर करून सरकारच्या निधी अंतर्गत नदी व तलाव संवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ही बाब यानिमित्ताने नोंद करण्यासारखी असून नदीच्या परिसरांतील नागरिकांना चांगले दिवस येतील अशी आशा करण्यास काही हरकत नाही.
डाइंगसाठी टँकर लॉबी उचलते नदीतून सर्रास पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 1:25 AM