ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरले आहे. या तानसा नदी काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासाच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी. पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १४६.८५ मिमी. नोंद घेतली आहे.तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरणाच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदी काठावरील गावाना सतर्क राहाण्याचा इशारा दहा दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार तानसा धरण गुरूवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहत आहे. तानसा धरणाची आज ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे. मोडकसागर धरणाची आज ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणा सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहे. तर वाढीव पाणी साठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. या पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यातील या मुसळधार पावसा दरम्यान कल्याणच्या पालव सीटी जवळील इमारतीतीत वीजेचे मीटर असलेल्या बोर्डला आग लागली होती. तर उल्हासनग-४ च्या परिसरातील नाल्याची भिंत पडली. यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर तानसा धरणाखालील तानसा नदीवरील व मोडक सागरच्या वैतरणा नदी काठावरील ३३ गावाना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा जारी केला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर या खालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी . पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तानसा धरण भरले;ठाणे जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 5:02 PM
ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणा-या बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहे. तर वाढीव पाणी साठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणी साठा तयार झाला आहे.
ठळक मुद्देभातसा धरणा सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणी साठा तयार आहेतानसा नदीवरील व मोडक सागरच्या वैतरणा नदी काठावरील ३३ गावाना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा